प्राजक्ता माळीचा तक्रार अर्ज मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवला, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. माझा जनता दरबार असल्याने प्राजक्ता माळीसोबत संपर्क झाला नाही असं देखील रुपाली चाकणकरांनी सांगितले आहे. संपूर्ण घटनेची वस्तुनिष्ठ अहवाल देण्याच्या सूचना देखील त्यांनी पोलिसांना दिल्या आहेत.
याचपार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर म्हणाल्या की, आमच्याकडे जी तक्रार आली ती मेल द्वारे आलेली आहे. कदाचित त्यांनी माझ्या कर्मचाऱ्यांची अध्याक्षांची जर का भेट झाली तर मी नक्की भेट घेईन... त्यांच्यासोबत माझा अद्याप काही संपर्क झालेला नाही पण जर का झाला तर मी नक्की बोलेन...
जी तक्रार आमच्याकडे येते त्या तक्रारी आम्ही लवकरात लवकर निकालात काढण्याचा प्रयत्न करतो किंवा संबंधित विभागाकडे देतो, प्राजक्ता माळीची जी तक्रार आमच्याकडे आली त्या अनुशंगाने आम्ही हा तक्रार अर्ज मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवला आहे. त्याची एक प्रत ही बीड पोलिसांना देखील देण्यात आली आहे....