नवीन वर्ष सुरु होऊन नुकताचं आठवडा झाला आहे आणि पहिल्या आठवड्यातच शेअर बाजारातील खळबळजनक बातमी समोर आली आहे. आठवड्याच्या पहिल्या व्यावसायिक दिवशी देशांतर्गत शेअर बाजारातील आजच्या घसरणीत पुन्हा एकदा सर्वात मोठा फटका बसला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची ताकद कमी होत आहे. तज्ज्ञांच्या मते, रुपयाच्या या घसरणीचे कारण भारतीय शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली अलीकडे केलेली विक्री आहे.
याशिवाय भू-राजकीय तणावाचाही रुपयावर नकारात्मक परिणाम झाला आहे. आयात महाग होईल रुपयात घसरण म्हणजे भारतासाठी वस्तूंची आयात महाग होईल. याशिवाय परदेशात फिरणे आणि अभ्यास करणेही महाग झाले आहे. समजा, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 50 होते, तेव्हा अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांना 50 रुपयांना 1 डॉलर मिळू शकतो. आता 1 डॉलरसाठी विद्यार्थ्यांना 86.31 रुपये खर्च करावे लागतील. त्यामुळे शुल्कापासून ते निवास, भोजन आणि इतर गोष्टी महाग होणार आहेत.
शेअर बाजार घसरण
आज बाजारातील विक्रीच्या वादळात सर्वच क्षेत्र लालेलाल झाले आहेत. बँकिंग, ऑटो, आयटी, धातू, एफएमसीजी, फार्मा, आरोग्यसेवा आणि ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्रीचा सपाटा लागला असून बाजारातील अस्थिरता मोजणारा इंडिया व्हिक्स 6.77 टक्क्यांनी वाढला आहे. त्याचसोबत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअर्सला देशांतर्गत बाजारातील घसरणीत पुन्हा एकदा सर्वात मोठा फटका बसला आहे. निफ्टी मिडकॅप सेन 900 सेन्सेक्स अंकांच्या घसरणीसह निफ्टीचा स्मॉलकॅप सेन्सेक्स 250 अंकांनी घसरला आहे.