Priyanka Chopra Team Lokshahi
ताज्या बातम्या

प्रियांकाने जगभरातील नेत्यांना केले हे आवाहन

Published by : Akash Kukade

युनिसेफ ची गुडविल अ‍ॅम्बॅसिडर प्रियांका चोप्राने (priyanka chopra)सोशल मीडिया (social media)अकाऊंटवर विडिओ शेअर करत जगभरातील नेत्यांना युक्रेनसह पूर्व युरोपीय निर्वासित आणि लहान मुलांना मदतीचे आवाहन केले आहे. (Priyanka Chopra appeals to world leaders amid Ukraine crisis)

दुसर्‍या महायुद्धानंतर प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने बालकांना आपले घर सोडून अन्यत्र आसरा शोधावा लागत असल्याचे प्रियांकाने सांगितले आहे. हा आजपर्यंतचा सर्वात मोठा 'रिफ्यूजी क्रायसिस' असल्याचेही प्रियांकाने म्हटले आहे.

युक्रेन आणि जगभरातील विस्थापित लोकांच्या मदतीसाठी तत्काळ कार्यवाही करण्याचे आवाहन प्रियांकाने जगभरातील नेत्यांना केले. ती म्हणाली, वीस लाख मुलांना आपल्या शेजारच्या देशांमध्ये आसरा शोधण्याची वेळ आली असून 25 लाख मुले युक्रेनमध्येच आपले घर व गाव सोडून अन्य सुरक्षितस्थळी गेली आहेत. त्यांच्यासाठी जगाने उभे राहिले पाहिजे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा