भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतरही पाकिस्ताननं कुरापती केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, दोन्ही देशांमधील तणावपूर्ण वातावरणात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला ठणकावलं आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कठोर निर्णयांमध्ये सिंधू पाणी करार स्थगितीचा महत्वाचा निर्णय समोर आला होता. हा सिंधू पाणी करार स्थगितीचा निर्णय कायम राहणार असल्याचे एस. जयशंकर म्हणाले. तसेच पाकिस्तानशी चर्चा केवळ दहशतवादावर, असेही त्यांनी पाकिस्तानला ठणकावलं. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीवरून सुरू असलेल्या चर्चांना अप्रत्यक्षपणे उत्तर देताना त्यांनी पीओकेबाबत तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप मान्य नाही, असे म्हटले आहे.