ताज्या बातम्या

Sabarmati-Agra Train Accident: राजस्थानात साबरमती एक्स्प्रेस अन् मालगाडीची धडक; 4 डबे रुळावरुन घसरले

राजस्थानातील अजमेरच्या मदार स्थानकाजवळ मोठा रेल्वे अपघात झाला आहे. या रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीला मागून येणाऱ्या रेल्वेनं धडक दिल्यानं मालगाडी रुळावरुन घसरली.

Published by : Dhanshree Shintre

राजस्थानातील अजमेरच्या मदार स्थानकाजवळ मोठा रेल्वे अपघात झाला आहे. या रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीला मागून येणाऱ्या रेल्वेनं धडक दिल्यानं मालगाडी रुळावरुन घसरली. मदार स्थानकाजवळ साबरमती एक्स्प्रेसनं उभ्या असलेल्या मालगाडीला धडक दिली. रात्री १ वाजून १० मिनिटाच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये हजारो प्रवासी प्रवास करत होते. साबरमती एक्स्प्रेसचे इंजिन आणि 4 डबे रुळावरुन घसरले. सध्या तरी या अपघातात एकही प्रवासी जखमी न झाल्याची माहिती समोर आली नाही. तर काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. ट्रेन रुळावरून घसरली आणी त्याचबरोबर विजेच्या खांबाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

या अपघातामुळं रेल्वे रुळ पुन्हा सुरू होण्यासाठी 8 तास लागणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या अपघातामुळं या मार्गावरील पाच गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर रेल्वेत बसलेल्या प्रवाशांना दुसऱ्या रेल्वेनं अजमेर रेल्वे स्थानकावर नेण्यात आलं.

या अपघातामुळं या रेल्वे मार्गावरील गाडी क्रमांक 12065 अजमेर-दिल्ली सराय रोहिल्ला, गाडी क्रमांक 22987 अजमेर-आग्रा फोर्ट, गाडी क्रमांक 09605 अजमेर-गंगापूर सिटी, गाडी क्रमांक 09639 अजमेर-रेवाडी आणि गाडी क्रमांक 19435 जयपूर-मारवाड एक्सप्रेस या पाच रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तर गाडी क्रमांक 12915 साबरमती दिल्ली, गाडी क्रमांक 17020 हैदराबाद हिसार एक्सप्रेस या दोन गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा