Mumbai Water Drowning Incident : विरारच्या अर्नाळा समुद्रात एक धक्कादायक घटना घडली आहे. पिकनिकसाठी गेलेल्या एका अल्पवयीन तरुणाचा अर्नाळा समुद्रात बुडून मृत्यू झाला. सचिन चौधरी (१७) असं मृत पावलेल्या मुलाचं नाव असून तो विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटी परिसरात राहत होता. या धक्कादायक घटनेमुळं चौधरी कुटुंबात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्नाळा सागरी पोलीस, तटरक्षक जवान आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने या मुलाच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. आज शनिवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास चौधरी कुटुंब आपल्या नातेवाईकांसह समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेले होते. यावेळी समुद्राच्या पाण्यात खेळत असताना सचिनचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती अर्नाळा सागरी पोलिसांनी दिली आहे.