Sadabhau Khot - Sanjay Raut Team Lokshahi
ताज्या बातम्या

"... पाहतो कोण येतो आडवाया"; सदाभाऊ खोत यांची खोचक टीका

सदाभाऊ खोत यांची टीका.

Published by : Sudhir Kakde

राज्यात सध्या वेगवेगळ्या मुद्दयांवरुन सत्ताधारी महाविकास आघाडी (MVA Government) आणि भाजपमध्ये (BJP) जोरदार संघर्ष सुरु आहे. केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईनंतर शिवसेना आज आक्रमक झाली असून, राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी शिवसेनेकडून (Shivsena) निदर्शनं करण्यात येत आहे. तर आता सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनीही नाव न घेता शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

सदाभाऊ खोत यांनी राज्यात सुरु असलेल्या सध्याच्या परिस्थितीवरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. "पक्ष झाला आमचा कवच-कुंडले, जनतेला दाखवून गाजर..! आम्ही झालो आमदार खासदार..!! लोकांची माथी भडकवुन नुकसान करु महाराष्ट्राचं...!!आणि चला आता मिळवुया लायसन्स परमिट भ्रष्टाचाराचं..! पाहतो आता, कोण येतो आम्हा आडवाया..! जनता आहे आमच्या स्वागताचे ढोल बडवाया..!!" असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी ही टीका केली आहे.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शिवसेना सध्या आक्रमक झाली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी शिवसेनेच्या (Shiv Sena) वतीने निदर्शनं करण्यात आली आहेत. संजय राऊत यांच्या स्वागतासाठी मोठी तयारी करण्यात आली होती. ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं. संजय राऊत यांच्यामागे संपूर्ण पक्ष खंबीरपणे उभा असल्याचा संदेश देखील देण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा