Sadabhau Khot Team Lokshahi
ताज्या बातम्या

"राज ठाकरे बाळासाहेबांच्या भट्टीतून तयार झालेलं रसायन, तर उद्धव ठाकरे..."

सदाभाऊ खोत यांची एका ठाकरेंवर मुक्ताफळं तर दुसऱ्या ठाकरेंवर टीका

Published by : Sudhir Kakde

राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्दयावरून राजकारण तापलं आहे. राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस सोबत जाऊन शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्दयापासून दूर गेली असल्याची टीका भाजपकडून करण्यात येतेय. तर शिवसेनेच्या (Shivsena) भुमिकेमुळे निर्माण झालेली पोकळी भरुन काढण्याचा प्रयत्न करत मनसेनं सध्या आपलं इंजिन हिंदुत्वाकडे वळवलं आहे. या सर्व घडामोडी सुरु असताना शिवसेनेने सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर (Shivsena) घणाघात केला आहे.

शिवसेनेने जे कडवं हिंदुत्व धारण केलेलं होतं, ते कडवं हिंदुत्व मुख्यमंत्र्यांकडे नाही. मुख्यमंत्री आता हिरवा शालू पांघरलेल्यांच्या बरोबर त्यांचा पदर डोक्यावर घेऊन सत्तेच्या खुर्चीवर बसलेले आहेत, त्यांचं हिंदुत्व नामोहरम झालेलं आहे अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली. ते आज राजापूरमधील तुळसवडे येथे उपस्थितांना संबोधित करत होते.

दरम्यान, राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भट्टीतून तयार झालेलं रसायन राज ठाकरे आहे. हिंदुत्वाला फुंकर घालण्याचं काम राज ठाकरे यांनी केलं आहे. त्यांच्या ज्वाला आता भडकलेल्या आहेत. या ज्वालांमध्ये कोणकोण भस्म होतं, हे भविष्यात आपल्याला पाहायला मिळेल.

सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, गेल्या लोकसभेमध्ये राज ठाकरेंनी 'लाव रे तो व्हिडिओ' असं म्हटलं की राष्ट्रवादीचे सगळे नेते हे माकडासारखे टाळ्या वाजवत होते. आज तेच राज ठाकरे हिंदुत्वाची शाल पांघरून हिंदुत्वाची भूमिका घेतल्याबरोबर स्टेजवरची टाळ्या वाजवणारी राष्ट्रवादीची माकडं रस्त्यावर उतरून टाळ्या वाजवत फिरायला लागलेली आहेत. एवढी शोकांतिका या राजकारणामध्ये असू शकत नाही, अशीही टीका सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा