ताज्या बातम्या

Sadabhau Khot : महाविकास आघाडी ही भरकटलेली आघाडी आहे

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक वक्तव्य केलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक वक्तव्य केलं आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, शहीद हेमंत करकरे यांना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतून लागली नव्हती. कोणत्याही अतिरेक्याच्या बंदुकीतून लागली नव्हती. तर ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्यानेच घातली होती, असा गंभीर दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सदाभाऊ खोत म्हणाले की, हेमंत करकरे हे पोलीस अधिकारी देशासाठी लढले, देशासाठी शहीद झाले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीचे नेते बेताल वक्तव्य करत आहेत. ते पातळी सोडून शहीद झालेल्यांचा अपमान करत आहेत.

यासोबतच ते म्हणाले की, जर हेमंत करकरे यांच्या बाबतीतलं चुकीच्या पद्धतीने काही घडलं असेल जर तुमचं सरकार आलं त्यावेळी तुम्ही शांत का बसला? कारण तुम्हाला सर्व अधिकार अडीच वर्ष राज्य चालवताना मिळालेलं होते. म्हणून महाविकास आघाडी ही भरकटलेली आघाडी आहे. असं म्हटले तर वावगं ठरणार नाही. असे सदाभाऊ खोत म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा