ताज्या बातम्या

Saharanpur : पोलिसांकडून आरोपीला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल !

सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये पोलिस कोठडीत असलेल्या काही तरुणांना बेदम मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सहारनपूर जिल्ह्यातील कोतवाली पोलिस स्टेशनचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी हे दावे फेटाळून लावले असले तरी आता व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या लोकांचे नातेवाईक पुढे आले असून हा व्हिडिओ सहारनपूरचा असल्याचे सांगत आहेत.

Published by : Shweta Chavan-Zagade

भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्माच्या ( Nupur Sharma) वक्तव्यावरून झालेल्या गदारोळाने आता हिंसक रूप धारण केले आहे. प्रयागराजपासून कोलकाता आणि सहारनपूरपासून रांचीपर्यंत हिंसाचाराची आग वेगाने पसरली. अशातच यूपीच्या (UP) सहारनपूरमध्ये (Saharanpur) झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी आरोपींना मारहाण केल्याचा व्हिडिओ (video viral) समोर आला आहे. यामध्ये पोलीस कोठडीत असलेल्या काही तरुणांना बेदम मारहाण करताना दिसत आहे. सुरुवातीला ही घटना कुठे घडली हे व्हिडिओचे ठिकाण समजू शकले नाही, मात्र हा व्हिडिओ सहारनपूर जिल्ह्यातील कोतवाली पोलिस स्टेशनचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी हे दावे फेटाळून लावले असले तरी आता व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या लोकांचे नातेवाईक पुढे आले असून हा व्हिडिओ सहारनपूरचा असल्याचे सांगत आहेत.

सहारनपूरमध्ये 10 जूनला नमाजानंतर मशिदीपासून क्लॉक टॉवरपर्यंत निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल करून आंदोलनकर्त्यांना अटक केली. या अटकेदरम्यान व्हिडीओ भाजप आमदार शलभ मणी त्रिपाठी यांनी ट्विट केला. या व्हिडिओमध्ये काही तरुणांना पोलीस कोठडीत बेदम मारहाण करत आहे. मात्र हा व्हिडीओ सहारनपूर पोलिस ठाण्यातील नसल्याचे जिल्ह्यातील उच्च पोलीस अधिकारी सांगत आहेत.

या व्हिडीओ संदर्भात कुटुंबाबरोबर बातचीत केली असता, कुटुंबातील मेहराज नावाच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि पोलीस ठाण्यात बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली. कोणताही गुन्हा दाखल न करता पोलिसांनी त्याला अटक करून तुरुंगात पाठवले, असा आरोप मेहराजच्या नातेवाईकांनी केला आहे.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मेहराज यांनी त्यांच्या घराजवळील मशिदीत दुपारची नमाज अदा केली होती आणि ते संध्याकाळपर्यंत घरीच होते, ज्याचे सीसीटीव्ही फुटेजही त्यांच्याकडे आहे. मेहराजच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, तो आपल्या ओळखीच्या व्यक्तीला सोडवण्यासाठी मित्रासोबत कोतवालीला गेला होता, त्याला काय प्रकरण आहे हे देखील माहित नव्हते. मात्र त्याचवेळी पोलिसांनी त्यालाही पकडून त्यांना आत टाकले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर तो पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तर तरुणांना अमानुष मारहाण करणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर