रुपेरी पडद्यावर खलनायक ताकदीनं रंगवणारे पण प्रत्यक्ष आयुष्यात नायक म्हणून त्यांचे काम अधिक महत्त्वाचं, असे कलाकार म्हणजे सयाजी शिंदे. पर्यावरण संवर्धनासाठी गेल्या दशकभरात महाराष्ट्रात करणारे राज्यभरात अनेक वृक्षारोपण मोहिमा राबवल्या. स्वतः 25 हजारांहून अधिक झाडं लावली. त्यामुळे अनेक उजाड माळरानं वृक्षवेलींनी बहरली. पर्यावरण रक्षणासाठीचे हे योगदान मोलाचे आहे. सह्याद्री देवराईच्या रुपाने एक सक्षम निसर्गाचं विश्व उभं करणारे, झाडं कशी लावावी, ती वाचवावी यासोबत महाराष्ट्रात कोणती झाडं लावली तर निसर्ग संवर्धन होऊन मानवहित साधलं जाईल, याचं भान व आपला अभ्यास व झपाटून काम करणारे सयाजी शिंदे. यांना या अनमोल योगदानासाठी 'माई मीडिया 24' आयोजित, 'प्लॅनेट मराठी'च्या सहकार्याने 'मीडिया असोशिएशन ऑफ इंडिया' (माई) च्या 'मीडिया एक्सलन्स ॲवॉर्ड 2025' ने सन्मानित करण्यात आले.
चित्रपटाच्या शूटींगमधे व्यग्र असल्याने ते पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहू शकले नाहीत. म्हणूनच त्यांना हा पुरस्कार त्यांच्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन प्रदान करण्यात आला. "माई मीडिया 24" च्या संस्थापक 'मीडिया असोशिएशन ऑफ इंडिया'च्या अध्यक्ष शीतल करदेकर, कार्याध्यक्ष सचिन चिटणीस, कोषाध्यक्ष व मुंबई जिल्हा अध्यक्ष चेतन काशीकर, मुंंबई शहर संघटन समन्वयक गणेश तळेकर, मुंबई कार्यकारिणी सदस्य विजय कांबळे व कार्यकारिणी सदस्य व लोककला अभ्यासक सूरज खरटकमल यांनी प्रदान केला.
हेही वाचा