बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या बांद्रा येथील राहत्या घरी चोरट्याने घुसून प्राणघातक हल्ला केला आला. हल्लेखोराने सैफ अली खानवर धारदार चाकूने तब्बल सहा वार केले. या हल्ल्यात सैफ अली खान जबर जखमी झाला. ऐन मध्यरात्री ही घटना घडली तेव्हा सैफला रिक्षाने लीलावती हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये सैफ अली खानवर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, वार गंभीर असल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सकाळी सहा ते दुपारी बारावाजेपर्यंत ही शस्त्रक्रिया करण्यात आली. आणि डॉक्टरांने सैफच्या पाठीत खुपसलेला २-३ इंच चाकूचा तुकडा बाहेर काढण्यात आला. त्यानंतर काही दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन त्याला घरी सोडण्यात आले.
'त्या' रात्री काय घडलं?
सैफ अली खानने पोलिस जबाबात सांगितले की, मध्यरात्रीच्या सुमारास हल्लेखोर खिडकीतून सैफ अली खानच्या घरात शिरला होता. सैफच्या इमारतीमधील काही मजले तो पायऱ्यांनी आणि खिडकीतून तो सैफच्या घरात शिरला.
त्याच्या घरातील महिला मदतनीसचा आवाज ऐकू आला. त्यामुळे तो बाहेर आलो. नॅनी एलियामाचा आरडाओरडा करत होती. ते ऐकून ११ व्या मजल्यावरील बेडरूममधून मी आणि करिना बाहेर आलो. हल्लेखोर जहॉंगीरच्या बेडरूममध्ये होता. जहॉंगीर खूप मोठ्याने रडत होता. हल्लेखोर जेहच्या दिशेने जात होता तेव्हा सैफ आणि त्याच्यामध्ये झटापट झाली. हल्लेखोराला मी पकडून ठेवलं पण सुटकेसाठी त्याने हल्ला केला.
सैफ पुढे म्हणाला, हल्लेखोराने हात, पाठ आणि मानेवर चाकूने वार केला. वार लागल्याने जखमी असूनही हल्लेखोराला ढकलून जहॉंगीरची बेडरूम बंद केली. घरातील सर्व कर्मचारी जहॉंगीरला घेऊन १२ व्या मजल्यावर सुरक्षित ठिकाण घेऊन गेले. रमेश, हरी, पासवान आणि रामू हे जहॉंगीरच्या बेडरूममध्ये गेले. हल्लेखोर तिथे नव्हता. कर्मचाऱ्यांनी संपूर्ण घरात हल्लेखोराचा शोध घेतला, तो सापडलाच नाही. त्यानंतर मी रिक्षा पकडून हॉस्पिटलमध्ये गेलो असे सैफ अली खानने जबाबात नोंदवले आहे.
दरम्यान, सैफ अली खानवर हल्ला प्रकरणात आतापर्यंत ३० जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. असल्याची माहिती मिळत आहे. सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांचाही जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.