अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपीची सैफच्या कर्मचाऱ्यांकडून ओळख पटली आहे. अभिनेता सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्या नर्स एलियामा फिलिप आणि आया जुनू यांनी हल्लेखोराला ओळख परेडमध्ये ओळखले आहे.
मुंबईतील आर्थररोड कारागृहात ही ओळख परेड करण्यात आली असून हल्ल्याच्या दिवशी फिलीप यांनी सर्वप्रथम आरोपी शरिफुलला पाहिले होते. 16 जानेवारीला झालेल्या हल्ल्यात घरात काम करणाऱ्या नर्स एलियामा फिलिप या देखील जखमी झाल्या होत्या.
आर्थर रोड कारागृहात पार पडलेल्या या ओळख परेडदरम्यान अटक आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम फकीरची ओळख आता पटली आहे.