थोडक्यात
अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरण
30 तासानंतर ही हल्लेखोर मोकाट
मुंबई पोलिसांची 20 पथकं आणि गुन्हे शाखेची 8 ते 10 पथकं आरोपीच्या शोधात
अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आला. सैफ अली खान यामध्ये जखमी झाला आणि सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या चोरट्याचा पोलिसांकडून अद्यापही शोध सुरूच असून मुंबई पोलिसांची 20 पथकं आणि गुन्हे शाखेची 8 ते 10 पथकं आरोपीच्या शोधात तैनात करण्यात आली आहेत.
सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवण्यात आला असून लवकरच सैफचाही जबाब नोंदवण्यात येण्याची शक्यता आहे.