अभिनेता सैफ अली खानवर गुरूवारी मध्यरात्री चोरट्याने चाकूनं हल्ला केला. मुंबईतील बांद्रा येथील घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला आहे. या प्रकरणी संशयित आरोपीला ठाण्यातून ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र, सैफवर झालेल्या हल्ला प्रकरणाला वेगळं वळण लागतंय का असा सवाल उपस्थित होत आहे.
सीसीटीव्हीतला आणि प्रत्यक्ष पकडलेला आरोपी वेगळा?
आज पहाटे ठाण्यातील कासारवडवली या ठिकाणावरुन त्याला अटक करण्यात आहे. आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला मुंबईत आणले. मोहम्मद शेहजाद असं आरोपीचं नाव आहे. आज (रविवारी) सकाळी पत्रकार परिषद घेत पोलिसांनी संशयित आरोपीचा फोटो जारी केला आहे. मात्र, सैफ अली खानच्या इमारतीतील सीसीटीव्ही व्हिडीओ फुटेजमध्ये दिसलेला आणि आज पकडलेला फोटोत दिसणारे दोन वेगवेगळे आरोपी आहेत का असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे आता पोलिसांनी पकडलेला शेहजाद खरंच मुख्य आरोपी आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आरोपी मोहम्मद शेहजाद बांगलादेशी?
सैफ अली खानच्या हल्लेखोराला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी शेहजादला 24 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी बांगलादेशी असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, शाहजाद बांगलादेशी असल्याचं सिद्ध झालेलं नसल्याचं आरोपीचे वकील संदीप शेखाणे यांनी दावा केला आहे.
हाऊसकीपिंगच्या माध्यमातून सैफ अली खानच्या घरामध्ये प्रवेश मिळवला- आरोपी
दरम्यान, अभिनेता सैफ अली खान प्रकरणातील आरोपींनी पोलिसांसमोर एक नवा खुलासा केला आहे. हाऊसकीपिंगच्या माध्यमातून सैफ अली खानच्या घरामध्ये प्रवेश मिळवला आणि त्या दिवसापासून सेफ अली खानच्या घराची रेकी करण्यात आली होती. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसाचे पोलीस कोठडी सुनावली आहे.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-