सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा अद्याप शोध सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत 30 जणांचा जबाब नोंदवण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांचाही जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेच्या एकूण 30 टीम या प्रकरणाचा तपास करत आहेत असून पोलिसांनी बांद्रामधील सर्व सीसीटीव्ही सीज केले असून आरोपींचा शोध सुरू आहे.
सैफ अली खानच्या तब्येतीमधील सुधारणा पाहूण घरी सोडण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे डॉक्टरांनी सांगितले आहे.