ताज्या बातम्या

Saiyaara : 'सैयारा'ची तरुणाईला भूरळ! पहिल्या दोन दिवसांतच मोडले बॉक्स ऑफिस रेकॉर्ड; नवोदित अहान - अनितवर कौतुकांचा वर्षाव

'सैयारा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवत फक्त 2 दिवसांत 50 कोटी रुपयांच्या टप्प्याजवळ मजल मारली आहे.

Published by : Team Lokshahi

दिग्दर्शक मोहित सूरी यांचा नवोदित कलाकार अहान पांड्ये आणि अनीत पड्डा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'सैयारा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवत फक्त 2 दिवसांत 50 कोटी रुपयांच्या टप्प्याजवळ मजल मारली आहे. शुक्रवार, १८ जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 19 जुलै, शनिवार या दुसऱ्या दिवशी 25.63 कोटींची कमाई केली असून एकूण कमाई 46.63 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

चित्रपटाने पहिल्याच दिवशी 20 कोटींची ओपनिंग घेतली होती, जी नवोदित कलाकारांच्या चित्रपटासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग आहे. विकेंड संपेपर्यंत हा चित्रपट 70 ते 80 कोटी रुपयांची कमाई करू शकेल, असा अंदाज चित्रपट विश्लेषकांनी वर्तवला आहे.

चित्रपट तज्ज्ञांच्या मते, सैयाराला देशभरात प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. मेट्रो शहरांपासून लहान शहरांपर्यंत, मल्टीप्लेक्सपासून सिंगल स्क्रीन थिएटरपर्यंत सर्वत्र गर्दी दिसून आली आहे.

सैयाराने मोडले मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड

2025 मध्ये रिलीज झालेल्या अनेक मोठ्या चित्रपटांची ओपनिंग कलेक्शन सैयाराने मागे टाकली आहे. हाऊसफुल 5, रेड 2, सिकंदर आणि सितारे जमीन पर या चित्रपटांच्या तुलनेत सैयाराची पहिल्या दिवसाची कामगिरी अधिक चांगली ठरली.

बुक माय शो या ऑनलाईन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मवर सैयारासाठी पहिल्या दिवशी तब्बल 4,19,000 तिकिटं विकली गेली. 2025 मध्ये केवळ विकी कौशलचा छावा हा चित्रपट यापुढे असून त्याने 6,69,000 तिकिटं विकली होती.

या प्रेमकथेवर आधारित चित्रपटात अहान पांड्ये क्रिश कपूर या नवोदित संगीतकाराची भूमिका करतो, जो आपल्या कलेमुळे यशाकडे झेपावतो. त्याची भेट वाणी (अनीत पड्डा) या एका भावनिक गीतकाराशी होते. त्यांच्या मैत्रीतून नातं फुलतं, मात्र नंतर काही कारणांमुळे वाणी त्याला कार्यक्रमातून चक्क सुरी दाखवत बाहेर जाण्यास सांगते.

आपल्या प्रेमात जखमी झालेला क्रिश व्यथित होतो. यावेळी त्याला सल्ला दिला जातो. "आपल्या प्रेमासाठी स्वतःचं नुकसान करू नको." पुढे क्रिश आपल्या संगीत कार्यक्रमांमधून लोकप्रियता आणि यश मिळवत मोठा स्टार बनतो.

'सैयारा'ने नवोदित कलाकारांचा चित्रपट असूनही प्रेक्षकांची मनं जिंकली असून, येत्या काही दिवसांत हा चित्रपट आणखी विक्रमी आकडे गाठेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. चित्रपटातील लव्हस्टोरीसह त्यातील गाणीही प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. पहिल्याच विकेंडला तुफान लोकप्रिय ठरणारा सैयारा आणखी काही आठवडे चाहत्यांची गर्दी चित्रपटगृहात खेचून आणेल, यात शंका नाही.

हेही वाचा

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा

Rain Alert : पुढील काही दिवस पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार...

Ramdas Kadam On Balasaheb Thackeray Death : उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा, रामदास कदमांचं खुलं आव्हान

Pomegranate Vs Beetroot : डाळिंब की बीट... शरीरात रक्त वाढवण्यासाठी काय जास्त फायदेशीर आहे?

Devendra Fadnavis : ठाकरे गटाच्या मेळाव्यावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....