नवरात्रीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. नवरात्री बोलं की, लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत गरब्याचा आनंद पाहायला मिळतो. परंतू या नवरात्रीला कुठेतरी गालबोट लागल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अहमदाबाद आणि इतर ठिकाणी ज्यापार्टी प्लॉटवर मोठ्या प्रमाणात गरबा उत्सव साजरे होतात, त्या ठिकाणांच्या बाहेर कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांची विक्री अचानक वाढली धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरून दिसून येतं की लोक नवरात्रीचा कसा वापर करीत आहेत.
अहमदाबादमधील विविध लोकप्रिय पार्टी प्लॉटजवळ कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांची विक्री वाढलेली आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात गरबा कार्यक्रम आयोजित केले जातात. गुजरातमधील इतर शहरांमध्ये जसे की सुरत, राजकोट आणि वडोदरा येथे देखील अशीच स्थिती आहे. यासंदर्भात अहवालात काही ठिकाणांची नावे दिली आहेत, पण त्यांचा उल्लेख येथे करणे उचित ठरत नाही.
एक खाजगी संस्थेचे संशोधन
अलीकडेच एका खाजगी संस्थेने नवरात्रीसंबंधी केलेल्या संशोधनातून काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. या संस्थेच्या संशोधनात म्हटले आहे की, 95% लोक चोळी घालून गरबा खेळणाऱ्या महिलांना आकर्षण म्हणून पाहण्यासाठी येतात. यावरून त्यांची श्रद्धा आणि भक्ती खूपच कमी आहे, परंतु त्या महिलांच्या सौंदर्याला ते अधिक महत्त्व देतात. फक्त 5% लोकच भक्तिरसात रंगलेले असतात.
नवरात्रीच्या उत्सवाच्या काळात 45 ते 51 वयोगटातील लोक सर्वाधिक आकर्षित होतात, आणि ते महिलांकडे अशा प्रकारे आकर्षण दाखवतात. तरुणांमध्ये प्रेमाची भावना जास्त असल्याचं संशोधनाने दाखवले आहे, म्हणजेच त्यांना गरब्याचा आनंद आणि पंरपरा जपण्याची अधिक इच्छा असते. वयोवृद्ध लोक मात्र त्यांच्या इच्छांच्या पूर्ततेसाठी महिला आणि त्यांच्या सौंदर्याचा वापर करतात. संशोधनानुसार, गरबा खेळणाऱ्या महिलांबद्दल एक बाब समोर आली आहे: त्या चालिया चोळी घालून प्रसिद्ध होण्यासाठी आकर्षित होतात, आणि त्यांना लोकांच्या नजरेत सुंदर दिसायला आवडते.