Salman Khan at Dharmaveer Trailer Launching Team Lokshahi
ताज्या बातम्या

Salman Khan म्हणाला, आनंद दिघे अन् माझ्यात 2 गोष्टी सारख्याच; CM ठाकरेंनी तिसरीही सांगितली

सलमानने मनोगत व्यक्त तर केलं, मात्र किती लोकांना हे आवडणार? असा सवाल निर्माण झाला आहे.

Published by : Sudhir Kakde

मुंबई : धर्मवीर (Dharmaveer) या चित्रपटाची सध्या राज्यात मोठी चर्चा सुरु आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या ट्रेलरचं आज मुंबईत मोठ्या थाटामाटात लॉचिंग झालं. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), एकनाथ शिंदे (Eknath Shinde), आदित्य ठाकरे, दादाजी भुसे, अब्दुल सत्तार, संजय राऊत या राजकारणी मंडळींसह सलमान खान, रितेश देशमुख अशे अनेक अभिनेते उपस्थित होते.

सलमान खान हे या कार्यक्रमांचं विशेष आकर्षण होतं. सलमान खानने या कार्यक्रमात आपलं मनोगत व्यक्त केलं. सलमान यावेळी म्हणाला, मला उद्धवजींनी आनंद दिघेंबद्दल सांगितलं. त्यावेळी मला लक्षात आलं की, त्यांच्यात आणि माझ्यात तीन गोष्टींचं साम्य आहे. त्यातलं एक म्हणजे ते सुद्धा फक्त एका बेडरुममध्ये राहत होते आणि मी सुद्धा. दुसरं साम्य म्हणजे त्यांनीही लग्न केलेलं नव्हतं आणि मी सुद्धा लग्न केलेलं नाही असं सलमानने सांगितलं.

दरम्यान, सलमान खानने स्वत: ची आनंद दिघेंशी केलेली ही तुलना किंवा सांगितलेलं हे साम्य किती लोकांना आवडणार हा सुद्धा प्रश्न आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा