Salman Khan Team Lokshahi
ताज्या बातम्या

"मला कुणाकडूनही धमकी..."; सलमान खानने पोलिसांकडे नोंदवला जबाब

सलमाना खानला धमकी आल्याने पोलिसांनी तपास सुरु केला होता.

Published by : Sudhir Kakde

मुंबई : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याचे वडील सलीम खान यांना मारण्याची धमकी देण्यात आल्याचं समोर आलं होतं. सलीम खान जिथे मॉर्नींग वॉकला थांबतात त्या ठिकाणी हे पत्र सलीम खान यांच्या सुरक्षा रक्षकाला हे पत्र मिळालं असून, त्यांनी ही माहिती होती. सलमानचा लवकरच सिद्धू मुसेवाला होणार असं या पत्रात म्हटलं असल्याचं पत्रात दिसत होतं. त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली असून, वांद्रे पोलीस ठाण्यात (Vandra Police Station) त्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे.

सलमान खानने या प्रकरणात आज पोलिसांकडे जबाब नोंदवला. त्यावर सलमान खानने पोलिसांना दिलेल्या जबाबात, अलिकडच्या काळात कोणत्याही व्यक्तीकडून धमकी, धमकीचे कॉल किंवा कोणाशीही वाद झाला नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. त्यामुळे आता पोलिसांसमोर पेच निर्माण झाला आहे.

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची रविवारी, 29 मे रोजी मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. पंजाब पोलिसांनी पंजाबी गायक सिद्धू मुसेवालासह 424 लोकांची सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली आहे. आपल्या गाण्याच्या खास शैलीमुळे युवावर्गात सिद्धूचे मोठे चाहते होते. तर दुसरीकडे त्याच्यावर गन कल्चरला चालना दिल्याचा सुद्धा आरोप होत होता. अनेकदा सिद्धू हत्यारं घेऊन फिरताना दिसायचा, त्याच्या गाण्यामधून सुद्धा ते अनेकदा दिसून यायचं. विशेष म्हणजे सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या लॉरेन्स बिष्णोईनेच काही वर्षांपूर्वी सलमान खानलाही मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे पोलिसांनी या धमकी प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाची चक्र फिरवली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : कोकण किनारपट्टीला आज ऑरेंज अलर्ट, ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

Ashadi Ekadashi 2025 : शेतकरी, कष्टकरी, सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य