ताज्या बातम्या

लवकरच तुमचाही सिद्धू मुसेवाला होईल; सलमानला धमकी देणारं पत्र आलं समोर

Salim Khan यांच्या सुरक्षा रक्षकाला काल हे पत्र मिळालं.

Published by : Sudhir Kakde

मुंबई :अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि सलीम खान यांना आलेल्या धमकीच्या पत्रामुळे सध्या बॉलीवूड जगतात खळबळ उडाली आहे. सलीम खान जिथे मॉर्नींग वॉकला थांबतात त्या ठिकाणी हे पत्र सलीम खान यांच्या सुरक्षा रक्षकाला हे पत्र मिळालं असून, त्यांनी ही माहिती दिली आहे. सलमानचा लवकरच सिद्धू मुसेवाला होणार असं या पत्रात म्हटलं असल्याचं सुत्रांकडून मिळालेल्या माहितीमधून समोर आलं आहे. त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली असून, वांद्रे पोलीस ठाण्यात (Vandra Police Station) त्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलमान खानला आलेल्या पत्रात "सलमान खान, सलीम खान तुमचाही लवकरच सिद्धू मुसेवाला होईल" असं म्हटलं आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची 29 मे ला गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्याच्या हत्येनंतर पंजाबमध्ये तसंच संपूर्ण म्युझीक इंडस्ट्रीमध्ये वातावरण ढवळून निघालं आहे. या हत्येमागे गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि कॅनडातील गोल्डी बरार यांचा हात असल्याचं सांगण्यात येतंय. विशेष म्हणजे यातील लॉरेन्स बिष्णोईनेच काही दिवसांपूर्वी सलमान खानलाही धमकी मिळाली होती. त्यामुळे आता सलमान खान आणि सलीम खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

शुभदीप सिंह सिद्धू उर्फ सिद्धू मूसेवालाची पंजाबच्या मानसामध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गायक असलेल्या सिद्धू मुसेवालाची मोठी फॅन फॉलोविंग होती. काँग्रेसच्या तिकिटावर नुकतीच त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांचा 'आप'चे डॉ. विजय सिंगला यांनी 63,323 मतांनी पराभव केला. मानसा जिल्ह्यातील मूसा या गावचा असलेल्या मूसेवालाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मोठ्या धूमधडाक्यात काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसने त्यांना मानसा विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिल्याने, तत्कालीन मानसाचे विद्यमान आमदार, नजर सिंग मनशाहिया यांनी वादग्रस्त गायकाच्या उमेदवारीला विरोध करणार असल्याचं सांगत पक्षाविरुद्ध बंड केले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Monorail : मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार; MMRDAने घेतला महत्त्वाचा निर्णय

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय