Abu Azmi On Government  
ताज्या बातम्या

"आरक्षणासाठी मुस्लिम समाज रस्त्यावर उतरल्यास गोळ्या घालतील," अबू आझमींचं खळबळजनक विधान

मराठा समाज आक्रमक झाल्याने सरकार झुकलं, अबू आझमींचा सरकारवर हल्लाबोल

Published by : Team Lokshahi

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील गेल्या काही महिन्यांपासून सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिलीय. मुस्लिम समाज आरक्षणासाठी जर रस्त्यावर उतरला, तर त्यांना गोळ्या घातल्या जातील, असा खळबळजनक आरोप अबू आझमी यांनी केला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना अबू आझमी म्हणाले, "मराठा समाज आक्रमक झाल्याने सरकार झुकलं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं. मुस्लिम समाज जर आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला, तर त्यांना गोळ्या घातल्या जातील."

दरम्यान, समाजवादी पक्षाची संघर्ष संविधान बचाओ संघर्ष यात्रा आज अकोल्यात पोहोचली आहे. यावेळी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमीही या यात्रेत सहभागी झाले होते. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झाल्याचे समोर येताच आता समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांनीही आरक्षणाबाबत मोठं विधान करुन सरकारवर टीका केली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा