नवीन वर्षात पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचा दौऱ्यावर होते. या दौऱ्यात फडणवीसांनी विविध विकासकामांचे लोकार्पण केले तसेच 11 नक्षलवाद्यांनीही आत्मसमर्पण केले.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ‘सामना’ मुखपत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच कौतुक करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आमच्याकरता आज आनंदाचा दिवस आहे. अनेक दिवसांपासून आम्ही वाट बघतोय सामना कधीतरी चांगले लिहील. यापूर्वी त्यांना चांगले लिहिता आलं असते. पण आज किमान देवेंद्रजींनी महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याकरता जे जे काही गडचिरोलीत असतील, या महाराष्ट्राचे नक्षलवाद संपवण्याचे विषय असतील, गडचिरोली सारख्या दुर्गम भागातल्या जनतेच्या विकासाचे विषय असतील किमान सामनातून देवेंद्रजींचे कौतुक होणे हे आमच्या सरकारला जे आमच्या सरकारला विकसित महाराष्ट्राकडे घेऊन जात आहे. त्याकरता आनंदाची गोष्ट आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, देवेंद्रजींनी यापूर्वीही असे अनेक निर्णय घेतले आहेत. तेव्हा आम्ही सामना अभिनंदन करेल याची वाट बघितली होती. पण ठिक आहे उशिरा केलं त्याबद्दल धन्यवाद. असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.