ताज्या बातम्या

“2014 नंतरचे नवे स्वातंत्र्य! स्वातंत्र्या तुझी खरी व्याख्या काय?” सामनातून सवाल

Published by : Siddhi Naringrekar

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकावावा, असे आवाहन केले आहे. तसेच भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना त्यांच्या घरांमध्ये राष्ट्रध्वज फडकवावा किंवा प्रदर्शित करा आणि त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या फोटोंवर भारतीय तिरंगा लावा असे आवाहन केले आहे. देश स्वतंत्र्य होऊन 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. देशभरात यंदा ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचा अग्रलेख सामनातून जोरदार टीका करण्यात आली आहे. स्वातंत्र्यासमोर आज आव्हानात्मक परिस्थिती आहे. देशातली घाण साफ करण्यासाठी मोदी आले, पण उपयोग झाला नाही. काही उद्योगपती, व्यापाऱयांना अटक झाली, पण जे खरेच तुरुंगात असायला हवेत ते सर्व भाजपचे देणगीदार व सरकारचे आश्रयदाते बनलेले आहेत. देशाची निरंकुश सत्ता मोदी-शहांच्या हातात आज आहे, पण स्वातंत्र्याची पहाट काळय़ाकुट्ट ढगांनी झाकली आहे. सार्वभौम लोकशाहीचा देव्हारा रिकामा आहे. न्यायालयांपासून वृत्तपत्रांपर्यंत सगळेच भीतीच्या सावटाखाली आहेत. निवडणुका होत आहेत, पण लागलेल्या निकालांवर लोकांचा विश्वास नाही. तिरंगा फडकतोय, पण संविधान पायदळी आहे. देशात अशी भयग्रस्त, अराजकसम स्थिती यापूर्वी कधीच निर्माण झाली नव्हती. तरीही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. स्वातंत्र्य व लोकशाही श्वास घेण्यासाठी धडपडत आहे! असे सामनातून म्हटले आहे.

यासोबतच आपले परमपूज्य पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ‘आझादी का अमृत महोत्सव’ जगभरात साजरा करायचे ठरवले व त्यानुसार आता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू झाला आहे. यानिमित्ताने घराघरांत तिरंगा वाटण्याचा उपक्रम आहे व काही कोटी तिरंग्याचे वाटप करण्यात आले. कॉंग्रेस पक्षाने देशाच्या स्वातंत्र्यलढय़ाचे नेतृत्व केले. गांधी, नेहरू, पटेल, मौलाना आझाद यांच्यासह सावरकर, भगतसिंग, अश्फाक उल्ला खाँ, राजगुरू यांच्यासह असंख्य क्रांतिकारकांचे योगदान स्वातंत्र्यलढय़ात आहे. टिळकांपासून नेहरूंपर्यंत काँग्रेसने सर्वाधिक संघर्ष केला. तुरुंगवास भोगला, पण काँग्रेसला पूर्णपणे बाजूला ठेवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. भारतीय जनता पक्षाचे काही उतावीळ लोक म्हणतात, देशाला खरे स्वातंत्र्य 2014 सालीच मिळाले.’ असे बोलणे किंवा विचार करणे हा त्या देदीप्यमान स्वातंत्र्य समराचा अपमान आहे. मंगल पांडे, तात्या टोपे, झाशीच्या राणीपासून सुरू झालेला हा संग्राम, त्यात हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, पारशी अशा सगळ्यांनीच योगदान दिले; पण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपला देश, लोकशाही व स्वातंत्र्य नक्की कोठे आहे ते तपासून घेण्याची वेळ आली आहे. अशी जोरदार टीका सामनातून मोदींवर करण्यात आली आहे.

“उद्याचा 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. पंतप्रधान मोदी यांनी उत्सव साजरा करा, असे सांगितले. घराघरांत तिरंगे वाटले गेले, पण कोणत्या स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव? काँग्रेसचे स्वातंत्र्यलढय़ातले योगदान विसरता येत नाही आणि देशाला स्वातंत्र्य 2014 नंतर मिळाले, असे ठामपणे सांगणारे लोक देशाच्या सत्तेवर आहेत” असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा