Admin
Admin
ताज्या बातम्या

ग्रामपंचायत निवडणूक निकाल; संभाजीराजे छत्रपतींच्या स्वराज्य संघटनेचा पहिला विजय

Published by : Siddhi Naringrekar

ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत असून सकाळी आठ वाजल्यापासून अनेक ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष बाजी मारतात की सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा मिळवते. याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

या निकालांमध्ये नाशिकमधील देवळा येथील वासोळ ग्रामपंचायतीमध्ये संभाजीराजेंच्या स्वराज संघटनेला पहिलं यश मिळालं आहे. स्वराज संघटनेने वासोळ ग्रामपंचायतीवर विजयाचा झेंडा फडकला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालामध्ये भाजपा आणि शिंदे गटाने ३६० ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. तर मविआने ३६३ ठिकाणी बाजी मारली आहे.

राज्यभरातील ७ हजार १३५ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले होते. या निवडणुकीसाठी ७४ टक्क्यांपर्यंत मतदानाची आकडेवारी गेली होती, सदस्यांसह थेट सरपंचांची निवड करणाऱ्या या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे.

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा