बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरुन मंत्री पंकजा मुंडे अद्याप का गप्प आहेत असा सवाल संभाजीराजे आणि खासदार बजरंग सोनावणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच वाल्मिक कराड शिवाय धनंजय मुंडे यांचे पान हालत नाही, हे पंकजा मुंडेच बोलल्या होत्या. असं देखील संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. तर वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर पंकजा मुंडे थोड्या तरी बोलल्या का? असा सवाल खासदार सोनावणे यांनी केला आहे.
माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार- संभाजीराजे छत्रपती
याचपार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, ज्या क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या झाली, हा विषय पूर्वीप्रमाणे प्रलंबित राहायला नको. नुसता संतोष देशमुख पुरता हा विषय नाही...माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार आहे...म्हणून सर्व पक्ष, धर्म लोक याठिकाणी एकवटले आहे...जातीच्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न आहे...हा मराठा विरोधात वंजारी विषय नाही...ही माणुसकीची हत्या आहे. मी राज्यपालांना विनंती केली की आपण या प्रकरणात लक्ष घालावे...
त्यामुळे वाल्मिक कराड सहज बाहेर पडू शकतात- संभाजीराजे छत्रपती
वाल्मिक कराड यांना जी कलम लावली आहेत, त्यामुळे ते सहज बाहेर पडू शकतात...खंडणी ऐवजी या प्ररकणा संबंधित असल्याने त्याप्रकारे त्यांच्यावर गुन्हा नोंद करावी...धनंजय मुंडे हे त्यांचे बॉस आहेत...त्यांचा राजीनामा द्यायला हवा...याआधी मनोहर जोशी, आर आर आबा, अशोक चव्हाण यांना पदावरून हटवले आहे.. मग धनंजय मुंडे यांना सरकार त्यांना पाठीशी का घालतंय?
कराड शिवाय मुंडेंचे पान हालत नाही, पंकजा मुंडेच बोलल्या- संभाजीराजे छत्रपती
पुढे संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, पंकजा मुंडे यांनी बोलायला पाहिजे... हा संपुर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. पंकजा मुंडे स्वत: म्हणाल्या आहेत, वाल्मिक कराडचं एवढं प्राभाल्य आहे की, धनंजय मुंडे यांचे पान सुद्धा हालत नाही, हे त्याच बोलल्या होत्या. हे जे सुरु आहे, ते महाराष्ट्राला परवडणारे नाही. पुढे संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, एसआयटीमध्ये पीएसआय आहे, त्याचा वाल्मिक कराड सोबत फोटो आहेत... तुम्हाला जर का न्याय हवा असेल तर शहाजी उमप यांच्यासारखे प्रामाणिक अधिकारी चौकशीसाठी नेमा, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत.