थोडक्यात
दिल्ली उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांचा मानहानी दाव्याची सुनावणी नाकारली.
‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ वेब सिरीजमुळे प्रतिमा डागाळल्याचा वानखेडे यांचा आरोप.
सुनावणी नाकारल्याने वानखेडेंच्या न्यायालयीन लढ्यावर प्रश्नचिन्ह.
आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे चर्चेत आलेले माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या वेब सिरीज विरोधात, दिल्ली उच्च न्यायालयात दोन कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला होता.
समीर वानखेडे यांनी आर्यन खान, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि नेटफ्लिक्स विरोधात बदनामीचा दावा दाखल केला असून या सिरीजमध्ये आर्यन खान प्रकरणाशी संबंधित घटनांचे चित्रण करण्यात आले आहे. त्यात त्यांचे नाव बदनाम केल्याचा आरोप वानखेडेंनी केला होता.वानखेडेंचे म्हणणे होते की, "या सिरीजमुळे त्यांची प्रतिमा धोक्यात आली असून चुकीचे संदेश समाजात गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यावसायिक आयुष्यावर आणि सन्मानावर परिणाम झाला आहे".
त्यांनी या पार्श्वभूमीवर निर्मात्यांविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने या खटल्याची सुनावणी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे वानखेडेंच्या दाव्याला धक्का बसला असून आता पुढे ते कोणता कायदेशीर मार्ग अवलंबतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.