नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी-आमणे या 76 किमी लांबीच्या 4 थ्या आणि शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यामुळे 701 किमी लांबीचा रस्ता हा वाहतुकीसाठी दाखल झाला आहे. त्यामुळे आता नागपुर ते मुंबई हा 16 तासांचा प्रवास आता फक्त आठ तासांमध्ये करता येणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या महामार्गाच्या पहिल्या टप्याचे उद्घाटन केलेले असताना शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण मात्र मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्याचबरोबर कॅबिनेटमधील इतर मंत्री आणि अधिकारी ही उपस्थित होते. या मार्गावरून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी टेस्ट ड्रायविंग पण केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाडी चालवली यावरून राज्याचे मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस असले तरी राज्याचे सारथ्य मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याची चर्चा रंगत आहे.
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह 24 जिल्ह्यांना जोडणारा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प खरंच विकासाकडे घेऊन जाणारा महामार्ग आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या दिशेने कार्यशील असलेले महायुतीच्या सरकारने आज समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण केले. या महायुतीच्या काळात अनेक महामार्ग अनेक विकासाची कामं ही पूर्णत्वास येत आहेत. त्यामुळे निश्चितच महाराष्ट्र विकासाच्या दिशेने पुढे सरकताना दिसत आहे. देशातील सर्वाधिक लांबीच्या या भोगद्यामध्ये कलाकारांना देखील यामध्ये संधी देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील संस्कृती दर्शवणारे चित्र, प्राण्यांचे शेतीचे चित्र, बदलत्या हंगामानुसार बदलणारी शेती, वारली पेंटिंग , योगसाधना अशा आशयाची चित्र या भोगद्यामध्ये रेखाटण्यात आली आहेत. समग्र महाराष्ट्राचे चित्रण करण्यात आले आहे.
मागील काही काळापासून विविध अपघातामुळे समृद्धी महामार्ग वादाच्या भोवऱ्यात सापडला असला तरी त्या दृष्टीने योग्य त्या उपायजोजना यामध्ये केल्या गेल्या आहेत. दिशादर्शक फलक, सीसीटीव्ही, अलार्म सेवा अशा गोष्टींकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. तसेच भोगद्यामध्ये जास्त तापमानाची नोंद झाली तर आपोआपच स्प्रिंकलरद्वारे पाण्याचे फवारे मारले जाणारे नवीन तंत्रज्ञान यामध्ये विकसित केले आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये सह्याद्रीच्या डोंगराला खोदून एकूण पाच भोगदे तयार करण्यात आलेले आहेत. 10 किमी पेक्षा जास्त लांब असलेले हे भोगदे देशातील सगळ्यात मोठे बोगदे मानले जात आहेत. या भोगद्यामंध्ये लाईट सिस्टिम, फायर सिस्टीम बरोबरच एका फोनची अर्थात ट्रंक कॉलची सेवासुद्धा देण्यात आली आहे. याचा उपयोग अपघाताच्या वेळी आपत्कालीन यंत्रणांना घटनास्थाळावर बोलावण्यासाठी निशितच होऊ शकतो. त्याशिवाय एका बोगद्यामधून दुसऱ्या भोगद्यामध्ये जाण्याची इंटरकनेक्ट सेवासुद्धा यात उपलब्ध आहे.