ताज्या बातम्या

Samudrayaan Mission : चांद्रयाननंतर भारताकडून आता समुद्रयान मोहिमेची तयारी

चांद्रयानच्या यशानंतर आता भारताकडून समुद्रयान मोहिमेची तयारी सुरु करण्यात आली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

चांद्रयानच्या यशानंतर आता भारताकडून समुद्रयान मोहिमेची तयारी सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेच्या यशामुळे सागरी संपत्तीची पाहणी करण्याची संधी तर मिळणार आहे. सबमर्सिबलच्या साहाय्याने मानवाला समुद्राच्या आत 6000 मीटर तळाशी घेऊन जाण्याची तयारी करण्यात येत आहे. ज्याला 'मत्स्य 6000' असे नाव देण्यात आले आहे.

समुद्रात 6000 मीटर खोलवर शोध घेण्याच्या उद्देशाने हे सबमर्सिबल तयार केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही अत्याधुनिक पाणबुडी असेल जी समुद्राच्या तळातून उठणाऱ्या भूकंपाच्या लाटा शोधण्यात सक्षम असेल. ही पाणबुडी टायटॅनियम मिश्र धातुपासून बनवली जात आहे.'मत्स्या 6000' या सबमर्सिबलची पूर्ण तयारी आणि चाचणी करण्याचे काम 2024 पर्यंत पूर्ण होईल. प्रवास 12 कॅमेऱ्यांच्या मदतीने रेकॉर्ड करण्यात येणार आहे.

भारताने 7000 मीटर खोलीपर्यंत मानवरहित पाणबुडी पाठवण्याचे मिशन पूर्ण केले आहे. आता मानवयुक्त मोहीम पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. असे रिजीजूंनी दिलेल्या माहितीनुसार समजते. ही सबमर्सिबल 3 लोकांना समुद्रात 6000 मीटर खोलीपर्यंत नेण्यास सक्षम असणार आहे. 2026 मध्ये ते समुद्राच्या खोलवर उतरवले जाणार आहे. 500 मीटर खोलीपर्यंत जाण्याची क्षमता असलेली ही पाणबुडी तयार करण्यात आली आहे. या मोहिमेला 'समुद्रयान मिशन' असे नाव देण्यात आले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा