दहशतवाद्यांनी जम्मू- काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी भारतीय पर्यंटकावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये निष्पाप 26 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर भारताने 7 मे रोजी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास पाकिस्तान Pakistan वर हल्ला केला. या मिशनला भारत सरकारने operation sindoor हे नाव देण्यात आले. भारताने पाकिस्तानमधील 9 तळांवर हल्ला केला होता. यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडिया अकाऊंट Social Media Account हटवले . अनेक पाकिस्तानी कलाकारांनी भारताविरोधात वादग्रस्त विधान करण्यास सुरुवात केली. 'सनम तेरी कसम' (Sanam Teri Kasam) चित्रपटातील पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन हिने भारतावर सतत होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध करणारे पोस्ट केली. तिच्या या वक्तव्यामुळे चित्रपटातील मुख्य अभिनेता हर्षवर्धन राणे संतापला आहे.
ऑपरेशन सिंदूर (operation sindoor) दरम्यान भारताच्या हवाई हल्ल्यांचा निषेध करणाऱ्या ट्विटने पाकिस्तानी अभिनेत्री मावराला टीकेचा सामना करावा लागला. तिने भारताला "भ्याड" असे म्हटले आहे. पाकिस्तानी लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला. तिच्या या वक्तव्यामुळे भारताने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. आता, चित्रपट निर्माते राधिका राव आणि विनय सप्रू हे सीमापार दहशतवादाबद्दल बोलणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. 'सनम तेरी कसम' चा पुढच्या भागासाठी अभिनेता हर्षवर्धन राणे Harshvardhan Rane आणि अभिनेत्री मावरा होकेन Mawra Hocane यांना चित्रपटामध्ये घेणार नसल्याचे चित्रपटाच्या निर्मांत्यांनी माहिती दिली आहे.
निर्मात्यांनी म्हटले आहे की, "भारत सरकारच्या भूमिकेचे पूर्ण समर्थ करण्यात आले आहे. आम्ही भारत सरकारच्या निर्णयाशी पूर्णपणे सहमत आहोत. एक रुपयाही देऊ नये, एक राष्ट्र म्हणून आपल्या वेळेतील एक मिनिटही वाया घालवू नये. कोणत्याही भारतीय व्यासपीठाने त्यांच्याशी संबंध ठेवू नये. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या राष्ट्राचे आणि आपल्या लोकांचे कल्याण. राष्ट्र प्रथम, नेहमीच!".
'सनम तेरी कसम' चित्रपटाचा मुख्य कलाकार हर्षवर्धन राणे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. मावरा जर, सनम तेरी कसम 2 च्या भागामध्ये काम करणार असेल, तर मी या चित्रपटामध्ये काम करणार नाही. पोस्टमध्ये हर्षवर्धन लिहितो की, "मी सर्व कलाकारांचा आदर करत पण माझ्या देशाविरुद्ध अपमानस्पद टिपणी मी सहन करणार नाही".