Sanjay Raut On Thackeray Bandhu Yuti : 'ठाकरे बंधूंमध्ये सुसंवाद, दसरा मेळाव्यानिमित्त युती पण...'

ठाकरेबंधू एकत्र दसरा मेळाव्यात दिसणार का? असा प्रश्न उपस्थितीत केले जात आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Published by :
Riddhi Vanne

थोडक्यात

शिवसेनेचा दसरा मेळावा साजरा केला जाणार आहे.

ठाकरेबंधू एकत्र येणार का अशी चर्चा सर्वत्र रंगली असून यांवर संजय राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

विचारसरणी मराठी माणसांसाठी एक असली तरी, दोन्ही पक्ष वेगळे आहेत.- राऊत

Sanjay Raut On Thackeray Bandhu Dasara Melva : दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा साजरा केला जाणार आहे. सध्या ठाकरेबंधू यांच्या एकत्र येण्याची चर्चा होणार आहे. दरम्यान राजकीय वर्तुळातून चर्चा रंगू लागल्या आहेत की, ठाकरेबंधू एकत्र दसरा मेळाव्यात दिसणार का? असा प्रश्न उपस्थितीत केले जात आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

त्यावेळी ते म्हणाले की, दसरा मेळावा एकत्र मला माहित नाही,उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात उत्तम संवाद अनेक बाबतीत सुरू आहे हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो. माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरेंचा गुढीपाडवा हा दुसरा वेगळा मेळावा असतो . विचारसरणी मराठी माणसांसाठी एक असली तरी, दोन्ही पक्ष वेगळे आहेत.

Sanjay Raut On Thackeray Bandhu Yuti :  'ठाकरे बंधूंमध्ये सुसंवाद
Amravati Ganpati Visarjan : अमरावतीत गणपती विसर्जनाला गालबोट; 2 वेगवेगळ्या घटनेत नदीत बुडून दोघांचा मृत्यू
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com