Sandip Deshpande Team Lokshahi
ताज्या बातम्या

संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद; कोरोना काळातील बीएमसीमधील कथित घोटाळ्याचा करणार गौप्यस्फोट

कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या घोटाळ्यांचे पुरावे आणि पेन ड्राईव्ह हाती आल्याचे वक्तव्य मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी केलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या घोटाळ्यांचे पुरावे आणि पेन ड्राईव्ह हाती आल्याचे वक्तव्य मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी केलं आहे. कोरोना काळात पालिकेत झालेल्या घोटाळ्याचे पुरावे सापडले असून ते आज (सोमवारी) जाहीर करणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले.

आपण कार्यालयात नसताना एक व्यक्ती कागदपत्र आणि पेन ड्राईव्ह ठेवून गेला. या पेन ड्राईव्हमध्ये कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या घोटाळ्यांचे पुरावे आहेत. मुंबईकरांची लूट कोणी आणि कशी केली याची माहिती तसेच बँक खात्यांचे पुरावेही मी सोमवारी जाहीर करणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले होते.

आज सकाळी अकरा वाजता मनसेचे नेते संदीप देशपांडे हे मुंबईतील विद्याधर हॅालमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी स्क्रीन लावण्यात येणार आहे आणि या स्क्रीनवर भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केले जाणार आहेत. याची माहिती मनसे संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, भेटू सकाळी 11 वाजता असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे. सोबतच एक फोटो शेअर केला आहे. त्यावर "कोरोनाव्हायरस स्कॅम... विरप्पन गँगचा सर्वात मोठा घोटाळा! मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांची पुराव्यासकट पत्रकार परिषद," असं लिहिलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : धनगर विद्यार्थ्यांच्या शिक्षण योजनेत भ्रष्टाचार; दोन शाळांची मान्यता रद्द, अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

Latest Marathi News Update live : जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेतही मंजूर

Dhadak 2 Trailer Out : पुन्हा एक हळवी प्रेमकहाणी; 'धडक 2' चा ट्रेलर लाँच

Mediclaim : विमा कंपन्यांकडून आरोग्य विमा क्लेमसाठी 24 तासांची अट शिथिल