Sangamner Police Team Lokshahi
ताज्या बातम्या

जेलमध्ये झाला 'भाईचा बड्डे'; संगमनेरमध्ये चार पोलिस निलंबित

Sangmaner : शहरात घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांवर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं जातंय.

Published by : Sudhir Kakde

संगमनेर | आदेश वाकळे : वाढदिवसाची पार्टी करणाऱ्या अनेकांवर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई (Sangamner) केल्याचं आपण ऐकलं असेल. मात्र संगमनेरमध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. संगमनेर शहर पोलीस (Sangamner Police Station) ठाण्याच्या शेजारी असलेल्या जेलमध्ये आरोपींनी वाढदिवस साजरा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी आता अधीक्षक मनोज पाटील यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील चार पोलिसांचं निलंबन केलं आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मागील आठ दिवसांपूर्वी जेलमधील आरोपींनी जेलमध्येच इतर कैद्यांसमवेत केक कापून वाढदिवस साजरा केला होता. याप्रकरणात संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कुलकर्णी, पोलीस हवालदार आनंदा भांगरे, पोलीस नाईक रामदास भांगरे, पोलीस हवालदार संजय साबळे, यांना निलंबहित करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काढले आहेत.

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या जेलमध्ये मागील आठ दिवसांपूर्वी बराक क्रमांक 1 मधील आरोपींनी वाढदिवस साजरा केला होता. जेलमध्ये वाढदिवसासाठी लागणारा केक आणि इतर साहित्य आत गेलं याचा ठपका या चारही पोलिसांवर ठेवण्यात आला आहे. एवढंच नाही तर वाढदिवसाचे फोटोही व्हायरल झाले. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी संबंधित कर्मचाऱ्यांचा कसुरी अहवाल जिल्हा पोलीसप्रमुख मनोज पाटील यांच्याकडे सादर केला. सदर पोलीस कर्मचाऱ्यांचं वर्तन पोलीस खात्याच्या शिस्तीला बाधा आणणारी आहे. यामुळे या चारही पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन झाल्यानं संगमनेर शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा