Admin
Admin
ताज्या बातम्या

निकालाआधीच सत्यजीत तांबेंच्या विजयाचे लागले पोस्टर्स

Published by : Siddhi Naringrekar

आज विधान परिषद शिक्षक-पदवीधर मतदारसंघाचा निकाल जाहीर होणार आहे. हा निकाल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. यामध्ये नाशिक, अमरावती या पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघातील पदवीधरांनी आणि शिक्षकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. याचा निकाल जाहीर होणार असून या पाचही जागांची मुदत 7 फेब्रुवारी रोजी संपत आहे.

या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. निकालाआधीच संगमनेरमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या विजयाचे पोस्टर्स लावण्यात आले आहे. या पोस्टरवर 'जीत सत्याची, विजय नवा पर्वाचा' भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल अभिनंदन असे लिहिण्यात आले आहे.

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 30 जानेवारीला मतदान झालय. त्याचा निकाल आज लागणार आहे. यात तीन शिक्षक तर दोन पद्वीधर मतदार संघाचा समावेश आहे. पाचही ठिकाणी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. मतदान प्रक्रिया मतपत्रिकेवर पार पडल्यामुळे निकाल दुपारनंतर येणं अपेक्षित आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील, अमरावती पदवीधरमध्ये काँग्रेसचे धीरज लिंगाडे-भाजपचे रणजित पाटील, औरंगाबादेत राष्ट्रवादीचे विक्रम काळे आणि भाजपचे किरण पाटील यांच्यात लढत आहे.

"भाजप सरकारच्या नादानपणामुळे भारतीय सैनिकांवर हल्ला झाला"; 'मशाल' पेटवून उद्धव ठाकरेंचं PM मोदींवर शरसंधान

IPL 2024 : धरमशाला मैदानात चेन्नई बनला सुपर 'किंग'! पंजाबचा केला दारुण पराभव

"तुतारीची आता पिपाणी करायची आहे"; फलटणच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा