ताज्या बातम्या

आधी प्रेम भंगचा व्हिडीओ, नंतर स्वतःच्या श्रद्धांजलीचा फोटो स्टेटसला ठेवून प्रेमवीराची आत्महत्या

सांगली येथील धक्कादायक घटना

Published by : Shweta Shigvan-Kavankar

संजय देसाई|सांगली - आधी प्रेम विराहाचा व्हिडीओ नंतर स्वतःच्या श्रद्धांजलीचा फोटो मोबाइलला स्टेटस ठेवून एका युवकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुशांत भरत तोडके असे या तरुणाचे नाव आहे. वाळवा येथे एका शेतामध्ये असणाऱ्या गोठ्यात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

वाळवा येथील खेड रस्त्यावर असणाऱ्या एका शेतात सुशांत भरत तोडके (वय २६, रा.नागठाणे, ता.पलूस) हा शेतमजूर म्हणून काम करत होता. सोमवारी सकाळी सुशांत याने काम करत असलेल्या शेतातील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान, आत्महत्यापूर्वी सुशांत याने आपल्या मोबाईलवर व्हॉटसअप स्टेटसला प्रेम भंगचा व्हिडीओ ठेवला होता. त्यानंतर अर्ध्या तासातच त्याने स्वतःचा फोटो आणि खाली भावपूर्ण श्रद्धांजली असा मजकूर स्टेटसला ठेवत गळफास घेतला.

सुशांत याचे व्हॉटस अपचे स्टेट्स पाहायला नंतर कुटुंबियांनी तातडीने भाड्याने राहत असलेल्या घर मालकाला फोनवरून सुशांतचा शोध घेण्यास सांगितले. त्यानंतर घर मालक ईशान गावडे यांनी सुशांतच्या कामाठिकाणी जाऊन पाहिले असता गोठ्यात त्याचा मृतदेह आढळून आला. सदर घटनेची नोंद आष्टा पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा