Accident Team Lokshahi
ताज्या बातम्या

Sangli : कार-कंटेनरच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण ठार

Accident News : उभ्या असलेल्या कंटेनरच्या डाव्या बाजूस कारने दिली धडक

Published by : Sudhir Kakde

सांगली | संजय देसाई : जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कासेगाव येथे आशियाई महामार्गावर येवलेवाडी फाट्यावर शर्यत हॉटेल नजीक कार आणि कंटेनर यांच्या झालेल्या भीषण अपघातात कार मधील ५ जण ठार झाल्याची घटना घडली. येवलेवाडी फाट्याजवळ असलेल्या हॉटेल शर्यत जवळ आशियाई महामार्गाच्या कोल्हापूर दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला कंटेनर (एमएच ०५ ए एम ३६४४) थांबलेला होता. मात्र कोल्हापूर च्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी कार (एमएच १४ डी एन ६३३९) ने उभ्या असलेल्या कंटेनरच्या डाव्या बाजूस जोराची धडक दिली.

दरम्यान, या अपघातामध्ये कारमधील चालक अरिंजय आण्णासो शिरोटे रा. जयसिंगपूर, यांच्यासह एक महिला स्मिता अभिनंदन शिरोटे वय ३८ व तीन मुले पूर्वा अभिनंदन शिरोटे वय १४, सुनिशा अभिनंदन शिरोटे वय ०९, वीरेन अभिनंदन शिरोटे वय ०४ गंभीर जखमी झाले होते यामधील तीघांना उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर येथे तर दोघांना प्राथमिक आरोग्य केंद्र कासेगाव येथे हलवण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. यावेळी महामार्ग काहीकाळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. अपघाताची माहिती मिळताच कासेगाव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून वाहतूक सुरळीत केली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा