Sangli  Team Lokshahi
ताज्या बातम्या

सांगली ट्रॅक्टर खाली येणाऱ्या आपल्या मुलांना वाचवताना आईचा दुर्दैवी मृत्यू या घटनेमुळे सर्वत्र हळहळ

संचिता संपत पाटील वय २८ असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव

Published by : Sagar Pradhan

संजय देसाई|सांगली: जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील तडवळे गावात उतरत्या जागेवरून थांबलेला ट्रॅक्टर पुढे येत असता त्याखाली खेळत असलेल्या आपल्या मुलाच्या अंगावर ट्रॅक्टर जाईल म्हणून या मुलांना वाचवण्यासाठी गेलेल्या महिलेस पाय घसरून पडताना ट्रॅक्टरचा नांगर लागल्याने गंभीर जखमी झाल्या त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. संचिता संपत पाटील वय २८ असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

तडवळे गावात जनावरांचा गोठा मयत संचिता पाटील या स्वच्छ करीत होत्या. याठिकाणी उताराला ट्रॅक्टर लावला होता. व तेथेच त्यांची क्रशांत वय २ आणि दुर्वा वय ४ ही दोन मुले खेळत होती. अचानक हा ट्रॅक्टर उतारामुळे पुढे पुढे येत आहे हे मयत संचिता यांनी पाहिले. त्या ट्रॅक्टर पुढेच मुले खेळत होती. त्यामुळे हा ट्रॅक्टर मुलांच्या अंगावर जाईल म्हणून मयत संचिता या मुलांना वाचविण्यासाठी पळत येत असता त्यांचा पाय घसरला व पडल्या. यावेळी त्यांना ट्रॅक्टर ला जोडलेल्या नांगराचा फाळ लागून त्या गंभीर जखमी झाल्या.

गंभीर जखमी संचिता यांना तातडीने इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा काल सायंकाळी साडे पाचच्या दरम्यान मृत्यू झाला.. याबाबत शरद बबन पाटील यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर मयत संचिता पाटील यांच्या वर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे..

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Rahul Gandhi : चंद्रपूरच्या राजुऱ्यातही मतचोरी? राहूल गांधींचा दावा, भाजपाने फेटाळला आरोप

Asia Cup 2025 PAK vs UAE : आधी पाकिस्तान-यूएई सामना चर्चेत, नंतर सामन्यादरम्यान पाकिस्तानचा खेळाडू आला चर्चेत; थेट अम्पायरलाच चेंडू मारला

मराठा आरक्षणाच्या लढ्यात मोठा विजय, हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका फेटाळली

Smart Sunbai : शिवाजी दोलताडे दिग्दर्शित 'स्मार्ट सुनबाई'; 'या' तारखेला होणार प्रदर्शित