ताज्या बातम्या

या मॉडेलमुळे सानिया मिर्झाचा घटस्फोट झाला? शोएब मलिकसोबतचा फोटो व्हायरल

टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक सध्या चर्चेत आहेत. या दोघांचा घटस्फोट झाला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक सध्या चर्चेत आहेत. या दोघांचा घटस्फोट झाला आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या जवळच्या एका व्यक्तीने सानिया आणि शोएब यांच्या नात्याबाबत ते वेगळे झाल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी सानिया मिर्झाने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली होती. सानियाच्या या पोस्टवरून शोएबसोबतच्या तिच्या नात्यामध्ये दुरावा आल्याची चर्चा सुरु झाली होती. सानिया आणि शोएबच्या जवळच्या मित्राने सांगितलं आहे की दोघांनी घटस्फोटासाठीची प्रक्रिया सुरु केली आहे आणि दोघांनाही एकमेकांपासून वेगळे राहायचे आहे. असे मिळालेल्या माहितीनुसार समजते. काही दिवसांपूर्वी तिने सानियाने तिचा मुलगा इजहानच्या वाढदिवसाला इजहानचा फोटो शेअर केला होता.

याच पार्श्वभूमीवर आता एक नवीन माहिती समोर आली आहे. वास्तविक, सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाचे कारण पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आयशा उमर असल्याचे सांगितले जात आहे. शोएब मलिकचे आयशासोबत अफेअर असल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. शोएब आणि आयशा गेल्या काही महिन्यांपासून एकत्र दिसत आहेत. त्याचवेळी, दोघांनी एका मासिकासाठी स्विमिंग पूलमध्ये एक बोल्ड फोटोशूट देखील केले, ज्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

शोएब मलिक आणि पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमर यांच्या अफेअरच्या बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे, हे सध्याच सांगता येणार नाही. मात्र, आयशासोबतच्या जवळीकतेमुळे सानिया आणि शोएबचे नाते तुटण्याच्या टोकाला पोहोचल्याचे लोकांचे मत आहे. आयशा एक प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तीला पाकिस्तानची स्टाईल आयकॉन देखील मानले जाते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा