ताज्या बातम्या

Sania Mirza post on Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरनंतर सानिया मिर्झाने केली 'ही' पोस्ट म्हणाली, आपण देश म्हणून....

सानिया मिर्झा ऑपरेशन सिंदूर: सानिया मिर्झाने पोस्ट शेअर करत महिला अधिकाऱ्यांच्या योगदानाचे समर्थन केले, देश म्हणून काय आहोत हे दाखवले.

Published by : Team Lokshahi

भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा Sania Mirza हिने भारताने पाकवरती केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ऑपरेशन सिंदूर Operation Sindoor ची माहिती ज्या दोन महिला अधिकाऱ्यांनी दिली. त्या म्हणजे सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर यांच्याबद्दल एक खास पोस्ट सानियाने शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सानियाने महिला अधिकाऱ्यांच्या योगदानाचे समर्थन केले. सानियाने पोस्टमध्ये म्हटले आहे की, "हा परफेक्ट आहे, आपण देश म्हणून काय आहोत हे दाखवणारा आहे.."

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करत 26 जणांचा जीव घेतला. त्यानंतर देशात संतापाची लाट उसळली. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याच्या प्रतिक्रिया सर्व स्तरातून उमटू लागल्या. अखेर 6 मे रोजी मध्यरात्री भारतीय सैन्य दलाने पाकव्याप्त काश्मीरमधील व पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवाद्यांच्या 9 तळांवर हवाई हल्ला (Air Strike) केला. ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) असं या मिशनला नाव देण्यात आलं. या हवाई हल्ल्याची माहिती भारतीय लष्करानं पत्रकार परिषद घेत दिली. ही माहिती देण्याची जबाबदारी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासह कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंग यांना सोपवण्यात आली होती.

Operation Sindoor

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक, आजच निकाल येणार

Saamana Editorial : पितृपक्षात ‘कौन बनेगा उपराष्ट्रपती?’ हाच प्रश्न आहे; उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर सामनातून भाष्य

Vice-Presidential Election : आज ठरणार भारताचे नवे उपराष्ट्रपती कोण? उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबद्दल A टू Z माहिती जाणून घ्या

Latest Marathi News Update live : आरक्षण दिलं नाही तर मुंबईत येऊन भाजीपाला बंद करु- मनोज जरांगे