दिशा सालियन जिचा मृत्यू 8 जून 2020 ला मुंबईमध्ये घराच्या बालकनीमधून खाली पडून झाला होता, तेच प्रकरण आता पुन्हा वर आलं आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नव्यानं चौकशीसाठी वडील सतीश सालियन यांची हायकोर्टात याचिका दाखल केली.
दिशाचा सामुहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा आरोप करत एनआयए चौकशीची मागणी तिच्या वडिलांनी केली आहे. यासाठी तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, यामुळे आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोर्या हे पुन्हा अडचणीत सापडले आहेत. दरम्यान शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी दिशा सालीयान प्रकरणी मोठा दावा केला आहे.
एसआयटी तपासात काहीही सापडणार - संजय गायकवाड
याचपार्श्वभूमिवर संजय गायकवाड म्हणाले की, "दिशा सालियन हे प्रकरण 5 वर्षापुर्वीच आहे. तिचा मृत्यू 14 व्या माळ्यावरून पडून झालेला आहे. त्यावेळेला तिच्या आई वडिलांनी जेवढ्या शंका व्यक्त करायला हव्या होत्या त्या त्यांनी पुर्वीच केलेल्या आहेत. मला असं वाटत की, साआयडी सारख्या कडक यंत्रणेने तपास करून याच्यामध्ये कोणताही राजकारी हात नाही किंवा अॅंगल नाही असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकरांच नाव असू दे किंवा आणखी कोणाच नाव असू दे, त्यांच या प्रकरणाशी नाव जोडणं हे तपासात आढळून आलेलं नाही. आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकरांना क्लिनचीट मिळण्याचा संबंधच नाही, एसआयटी तपासात काहीही सापडणार नाही".