Admin
Admin
ताज्या बातम्या

नेर कृषी उत्पन्न बाजार समितीत पालकमंत्री संजय राठोड यांचे वर्चस्व; माजी मंत्री माणिकराव ठाकरे व संजय देशमुख यांना धक्का

Published by : Siddhi Naringrekar

संजय राठोड, यवतमाळ

नेर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान झाल्यानंतर अवघ्या काही वेळात मतमोजणीला सुरुवात झाली. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यात पालकमंत्री संजय राठोड यांनी आपले वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळवले, तर माजी मंत्री माणिकराव ठाकरे व संजय देशमुख यांना धक्का सहन करावा लागला.

नेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल रात्री उशिरा हाती आले. यात एकूण १८ जागापैकी उध्दव ठाकरे आणि काँग्रेस आघाडी ८ आणि शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी युतीला १०दहा जागा मिळाल्या. कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती.

या निवडणुकीने राजकिय वातावरण चांगलेच तापले होते. प्रचारादरम्यान आरोप- प्रत्यारोपाचा धुरळा उडाला. परंतु, पालकमंत्री संजय राठोड यांचे असलेले काम आणि सर्वसामान्य लोकांसोबत असलेला जनसंपर्क विरोधकांवर भारी पडला. निकाल जाहीर होताच पालकमंत्री राठोड समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.

'आमचं सरकार आलं तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू' राहुल गांधींची मोठी घोषणा

Garlic: उन्हाळ्यात 'या' लोकांनी लसूण खाणे टाळावे

Cold Water: माठातील पाणी फ्रिजसारखं गार कसं करायचं? जाणून घ्या...

Kalyan Loksabha : कल्याण लोकसभा मतदारसंघात ट्विस्ट, ठाकरे गटाच्या रमेश जाधवांचा उमेदवारी अर्ज दाखल

Abhijeet Patil: अभिजीत पाटील यांना दिलासा, विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई मागे