Ashish Shelar Lokshahi
ताज्या बातम्या

आमदार आशिष शेलारांचं संजय राऊतांना रोखठोक प्रत्युत्तर; म्हणाले, "श्रीमान मोरारजी राऊत..."

खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सामन्याच्या अग्रलेखात केलेल्या टीकेला मुंबई भाजप अध्यक्ष तथा आमदार आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Published by : Naresh Shende

Ashish Shelar On Sanjay Raut: खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सामन्याच्या अग्रलेखात केलेल्या टीकेला मुंबई भाजप अध्यक्ष तथा आमदार आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शेलार यांनी ट्वीट करून राऊतांचा समाचार घेतला आहे. “श्रीमान मोरारजी राऊत” असा उल्लेख करत शेलारांनी पलटवार केला आहे.

आशिष शेलार ट्वीटरवर काय म्हणाले?

श्रीमान मोरारजी राऊत! महाराष्ट्रात एखादा उद्योग, व्यवसाय येणार किंवा नविन विकास प्रकल्प होणार, असे कळताच कट कमिशन आणि राजकीय स्वार्थासाठी हातात विरोधाचा झेंडा घेऊन जे उतारतात, उद्योगांना महाराष्ट्रातून पळवून लावतात, त्याच पक्षाचे नेते संजय राऊत महाराष्ट्रातून उद्योग गेले म्हणून "हग्रलेख" लिहितात?

आता विषय काढलाच आहे तर मग, संजय राऊत तुम्हाला उत्तर द्यावी लागतील...मुंबई सोडून एलएनटी का गेली? कुणाची युनियन होती? महिंद्रा कंपनी मुंबई सोडून अन्य राज्यात का गेली? कुणाची युनियन होती? खंबाटा, एएफएल लॉजिस्टीक यांना शटर डाऊन का केलं? या सर्वांना यूनियन बनवून कुणी त्रास दिला? ही मुंबईतील काही मोजकी उदाहरणे महाराष्ट्रातील गेल्या १५ वर्षातील उद्योग बंद झाले. त्याचा हिशोब काढला तर मग पुण्याच्या बजाज पासून सर्व कारखान्यांमध्ये उबाठाचीच युनियन होती ना?

वेदांत फॉस्कॉन, बारसूची ग्रीन रिफायनरी, वाढवण बंदर या प्रकल्पांना विरोध कोण करतोय? आणि पुन्हा महाराष्ट्रातून प्रकल्प गेले म्हणून ओरडताय? चोर तर चोर वरून शिरजोर? मराठी कामगारांना उद्ध्वस्त करणाऱ्या उबाठाचे हात मराठी माणसाच्या रक्तानेही माखलेले आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसावर गोळ्या झाडणाऱ्या स.का. पाटील, मोरारजी देसाई यांच्या काँग्रेसच्या मांडीवर तुम्ही बागडत आहात ना?

काँग्रेसशी हातमिळवणी केलीत, तुमच्या हाताला मराठी माणसाचे रक्त लागलेले आहे. तुम्हाला इतिहास कधीच माफ करणार नाही. श्रीमान संजय राऊत तुमचे कसे झालंय सांगू का? दुर्दैवाने ज्याला वेड लागते म्हणजे तुमच्या सारखा जो मनोरुग्ण असतो त्याला ना "आपण सोडून सगळं जग वेडं वाटत असतं."म्हणून तुम्ही मोरारजी राऊत आहात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

Ashadi Ekadashi 2025 : शेतकरी, कष्टकरी, सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य