Sanjay Raut  
ताज्या बातम्या

"...हा विषय न्यायालयात जाईल"; खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर साधला निशाणा

"रामाच्या नावाने तोच अहंकरा सुरु होता. पण जनतेनं त्यांना रोखलं आहे. पूर्णपणे रोखलं नाही, पण आरएसएसला आता हे काम पूर्ण करायचं आहे"

Published by : Naresh Shende

Sanjay Raut On Narendra Modi : देवाच्या समोर तुम्ही काही जागांची चोरी केली आहे. जवळपास ३० जागांवर भाजपचा पराभव झालेला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांना भीती दाखवून आणि धमक्या देऊन भाजपने विजय प्राप्त केला आहे. हा विषय कोर्टात जाईल. भाजपचा पूर्णपणे पराभव झालेला आहे. मोदी, अमित शहा हरले आहेत. वाराणसीत नरेंद्र मोदींचा पराभव झाला आहे. देव सर्व पाहत आहे. अयोध्या, चित्रकूट, नाशिक, रामेश्वरम, रामटेकमध्ये तुमचा पराभव झाला आहे. जिथे जिथे प्रभु रामाचं वास्तव्य राहिलं आहे, त्या सर्व पवित्र भूमिवर अहंकाराचा पराभव झाला आहे. रावण अहंकारी होता, त्यामुळे प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला. आज रामाच्या नावाने तोच अहंकरा सुरु होता. पण जनतेनं त्यांना रोखलं आहे. पूर्णपणे रोखलं नाही, पण आरएसएसला आता हे काम पूर्ण करायचं आहे, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, समाजसेवकाला अहंकार नसला पाहिजे. या देशात फक्त अहंकराच असल्याचं आपण गेल्या दहा वर्षात पाहिलं आहे. अंहकार, इर्ष्या, बदला घेण्याचं राजकारण सुरु आहे. सत्तेचा गैरवापर सुरु आहे. हे सर्व भाजपचं आरएसएस पाहत राहिलं आहे. दहा वर्षात आम्ही आरएसएसकडून खूप मोठ्या अपेक्षा ठेवल्या होत्या. आरएसएसचे लोक निर्भय बनून समोर येतील आणि बदला घेण्याच्या राजकारणाला रोखतील, असं वाटलं होतं. १९७५ मध्ये इंदिरा गांधी यांच्या काळात आणीबाणी आली होती.

तेव्हा बाळासाहेब देवरस आरएसएसचे संघचालक होते. तेव्हा सरसंघचालकांनी तानाशाहीचा विरोध केला होता आणि त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आरएसएसच्या लोकांचं योगदान राहिलं आहे. ते तुरुंगातही गेले आहेत. पण दहा वर्षात आम्ही उलट झालेलं पाहिलेलं आहे. अहंकाराच्या राजकारणाला जनतेनं रोखलं आहे. अहंकारी शिरोमणींना आरएसएस सत्तेतून दूर करण्याचा लवकरच प्रयत्न करतील, असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही जनतेला जनार्दन म्हणतो. जनताच लोकशाहीचा देव आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis on Thackeray Brothers : "ब्रँडचा बॅन्ड वाजवला" मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना खोचक टोला

आजचा सुविचार

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते