ताज्या बातम्या

रोज बाळासाहेबांच्या नावाने पोपटपंची करता, आता बाळासाहेबांना कसं विसरलात?; शिंदेंच्या जाहिरातीवर राऊतांची टीका

Published by : Siddhi Naringrekar

मुख्यमंत्री शिंदेंच्या जाहिरातीनं भुवया उंचावल्या आहेत. एकेकाळी देशात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र अशी घोषणा केली होती. मात्र आता गेले काही दिवस भाजपा आणि शिवसेनेत सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून वृत्तपत्रांमध्ये जाहिरातबाजी करण्यात आली आहे.

सगळ्या वृत्तपत्रात पहिल्या पानावर ही जाहिरात देण्यात आली आहे. या जाहिरातीची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरु आहे. या जाहीरातीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंना सर्वाधिक पसंतीचा दावा करण्यात आला आहे. 'मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंना 26.1%पसंती' देण्यात आली आहे तर फडणवीसांना 23.2% पसंतीचा दावा करण्यात आला आहे. यासोबतच राज्यातील 49.3% जनतेनं शिंदे-फडणवीसांना पसंती दर्शवल्याचा दावा केला आहे. मतदानासाठी भाजपला 30.2%, शिवसेनेला 16.2% जनतेनं कौल दिल्याचे सांगण्यात आले आहे. तर भाजप-शिवसेना युतीला पुन्हा सत्तेवर आण्यासाठी 46.4% जनता इच्छुक असल्याची माहिती या जाहिरातीतून मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, ही जाहिरात सरकारी आहे का? बाळासाहेबांचा फोटो कुठे दिसत नाही. वर्षा बंगल्यापुरता हे मर्यादित आहे. रोज बाळासाहेबांच्या नावाने पोपटपंची करता, आता बाळासाहेबांना कसं विसरलात? आनंदाच्यावेळी बाळासाहेबांना कसे विसरलात. असे म्हणत राऊतांनी जोरदार टिका केली आहे.

"छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान करेल, त्याला गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही"; नाशिकमध्ये उद्धव ठाकरे कडाडले

"इंडिया आघाडीच्या नादाला लागून उबाठाने पाकिस्तानची हुजरेगिरी केली"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Daily Horoscope 16 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ; पाहा तुमचे भविष्य

"काँग्रेस फक्त हिंदू-मुस्लिमांचं राजकारण करतं"; कल्याणच्या सभेत PM मोदींची तोफ धडाडली

दिनविशेष 16 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना