Sanjay Raut Team Lokshahi
ताज्या बातम्या

"PM नरेंद्र मोदी हिटरलचे फॉलोअर, त्याप्रमाणेच ते..."; संजय राऊतांचा घणाघात

संजय राऊत यांनी आज शिवसैनिकांना सोशल मीडियावर ताकद वाढवण्याचा सल्ला दिला.

Published by : Sudhir Kakde

मुंबई : संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपवर (BJP) निशाणा साधला. आमच्या विरोधात काही लोक रोज बोलतात, त्यांना ते काम देण्यात आलेलं आहे. युट्यूबर विकत घेऊन संघाने हे काम सुरु केलं आहे. सोशल मीडियावरुन केल्या जाणाऱ्या कामाला आपल्यालाही कॉर्पोरेट टच द्यावा लागणार असं राऊत म्हणाले. आपण लिहीत असेलेलो बोलत असलेला एकही शब्द वाया जायला नको असं म्हणत आयटी सेलवर लक्ष देण्याचा सल्लाच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी उपस्थित शिवसैनिकांना दिला.

संजय राऊत यांनी सांगितलं की, जसं रस्त्यावर लढणं महत्वाचं आहे, तसंच सोशल मीडियावर देखील लढावं लागणार आहे. आपण अयोध्येला चाललो तर तिकडे लोकांनी लोकांना मोजक्याच शब्दात लिहीलं 'असली आ रहे है!'. अशाच पद्धतीने आपल्याला काम करावं लागणार आहे. बाळासाहेब ठाकरे हे आपलं एकमेव उर्जास्त्रोत आहेत. त्यामुळे कोणतीही परिस्थिती आली तरी आपल्या चेहऱ्यावर तणाव दिसता कामा नये असं संजय राऊत म्हणाले. तसंच किरीट सोमय्या यांना जामीन मिळाला. मात्र मी एकच म्हणालो, 'बाप बेटे जेल मे जायेंगे' ते मी आजही म्हणतोय की बाप बेटे जेलमध्ये जाणार असंही राऊतांनी यावेळी सांगितलं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा