ताज्या बातम्या

'दादांनाही नाही आणि फडणवीसांनाही नाही, दुसऱ्याच व्यक्तीला मुख्यमंत्री पद मिळणार' राऊत काय म्हणाले...

खासदार संजय राऊत यांनी अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

Published by : shweta walge

सत्तेत सामिल होण्यापूर्वी अजित पवार यांनी अनेकदा अमित शहा यांची गुप्त भेट घेतली. मास्क आणि टोपी घालून अजित पवार दिल्लीत जायचे आणि विमानाचं तिकिट बूक करताना देखील ए.ए.पवार या नावाने विमानाचं तिकिट बूक करायचे अशी धक्कादायक माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या गौप्यस्फोटावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

राऊत म्हणाले की, महाराष्ट्राला नाटकाची मोठी परंपरा आहे महाराष्ट्च्या रंगमंच यांनी मोठे कलाकार दिले. त्या नाट्य सृष्टीने अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. यांना सुध्दा यापुढे नाटकात सहभागी करून घेतला पाहिजे. ते उत्तम पद्धतीने चेहरे बदलतात. आता पाहा अजित पवार नाव बदलून टोप्या बदलून खोट्या मिष्या लावून फिरणार. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे वेष बदलून सरकार कसे पडायचे याची चर्चा करत होते. एकनाथ शिंदे चित्रपट काढतायेत खोट्या कथा लिहून. त्यांनी स्वतावर्ती जे नाटक रचल होता त्यावर त्यांना जर एक नाटक आणि सिनेमा काढायचा असेल तर मी एक चांगला लेखक आहे. मी लिहितो मला प्रसंग त्यांच्या पेक्षा जास्त माहिती आहे.जेव्हा भाजपचे राज्य नव्हते तेव्हा ते अहमद पटेल यांना वेश बदलून भेटायचे हे पृथ्वीराज चव्हाण जास्त चांगले सांगू शकतात.

नीती आयोगावर ते म्हणाले, नीती आयोग म्हणजे देशासाठी आर्थिक औद्योगिक एज्युकेशन बाबतीत दिशा देणं योजना देण पैसे देणे. पण ज्याप्रकारे बजेट बनल आहे तस नीती आयोग काम करत. जिथे भाजपचे राज्य आहे तेथे पैसे देणे.

ममता जी निघून गेल्या, त्यांना बोलून दिल नाही. पश्चिम बंगाल सारख्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला ज्याप्रकारे अपमानित करणं माईक बंद करणे लोकशाहीला शोभा नाही देत . आमचे माइक बंद केले जातात. राज्याचे अनेक मुद्दे आहे. केंद्रांनी मदत केली पाहिजे. आंध्र प्रदेश आणि बिहार भरभरून देतात हा अधिकारी सर्व राज्यांचा आहे. आपण जे पैसे वाटत आहात तो मोदींच्या गुजरात मधून नाही येत.

महायुती जागा वाटप, आता हे मी कसं काय सांगणार. एकनाथ शिंदे एक मोठे नेते आहे ते २८८ जागा ही लढू शकतात. विधान सभेच्या निकालानंतर कळेल राज्याचं मुख्यमंत्री पद कोणाकडे येत आहे. दादांना पण नाही आणि फडणवीस यांनाही नाही. दुसऱ्याच व्यक्तीला भेटणार मुख्यमंत्री पद मिळणार असल्याच राऊत म्हणाले आहेत.

अमित शहा यांच्यावर जो आरोप आहे ते आम्हाला बोलायला लावू नका. शरद पवार हे सत्यच बोलले आहे. अमित शहा यांच्यावर सर्व खटले मोदी सत्तेत आल्यावर काढून टाकले. तडीपारची नोटीस आणि गुजरातमध्ये येण्याची बंदी होती का नाही अमित शहा तुरुंगात होते की नाही अमित शहा यांच्यावर कुणाचा कट केला होता तो गुजरातच्या बाहेर चालवावा हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश होते पियुष गोयल यांनी खोटं बोलू नये लोक त्यांच्यावर हसतील.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा