ताज्या बातम्या

Sanjay Raut : पीएम केअर फंडातून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, संजय राऊतांची मागणी

मराठवाड्यात लाखो शेतकरी उद्धवस्त झाले आहेत. त्यांची घर पाण्यात, शेती-जमीन वाहून गेली आहे. त्यांना मदत मिळाली असं मुख्यमंत्री म्हणतात पण त्यांच्यापर्यंत अजून मदत पोहोचलेली नाही, पंचमाना झाला नाही असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खसादर संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा अशी राऊतांची मागणी

  • 36 लाख शेतकरी आणि त्यांची कुटुंबं हवालदिल

  • पीएम केअर फंडात मुंबईतून सव्वा दोन लाख कोटी रुपये

मराठवाड्यात लाखो शेतकरी उद्धवस्त झाले आहेत. त्यांची घर पाण्यात, शेती-जमीन वाहून गेली आहे. त्यांना मदत मिळाली असं मुख्यमंत्री म्हणतात पण त्यांच्यापर्यंत अजून मदत पोहोचलेली नाही, पंचमाना झाला नाही असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खसादर संजय राऊत (Sanjay Raut)यांनी सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी तत्काळ व्हावी, पीएम केअर फंडातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा अशी मागणी राऊतांनी केली.

काल उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त मराठवाड्याचा दौरा केला. ते अनेक गावात गेले, घरात गेले, बांधाच्या पलीकडेही गेले. शेतकरी त्यांची वाट पहात होते, महिला, लहान मुलं, वृद्ध, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यांचे कुटुंबीय हे सगळे उद्धव ठाकरेंची वाट पहात होते. मराठवाड्याचं , शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, 36 लाख शेतकरी आणि त्यांची कुटुंबं हवालदिल आहेत, आजही त्यांना निवारा नसल्यामुळे ते निर्वनासितासारखे रहात आहेत. त्यांच्यापर्यंत सकारी मदत पोहोचली असं सरकारचं म्हणणं आहे.

फडणवीसांच्या म्हणण्यावर जाऊ नका,आम्ही गोट्या खेळतोय का असं म्हणणाऱ्यांच्या (अदित दादा) त्यांच्या बोलण्यावरही जाऊ नका. किंवा जे स्वत:चे फोटो छापून मदत वाटण्याचा प्रयत्न करत आहेत, ते खोटं बोलत आहेत. आम्ही चित्र पाहिलं आहे, अद्याप पंचनाम्याला अधिकारी पोहोचलेले नाहीत, मदत पोहोचलेली नाही. घरात पाणी शिरलंय, शेतात नदीचा प्रवाह वळला, शेती, जमीन राहिलीच नाहीये. शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंना कृतज्ञतापूर्वक सांगितलं की आपण जी कर्जमाफी केल, त्याच्याआधारे आम्ही इथपर्यंत आलो आहोत,आता पुन्हा कर्जमाफी केली नाही तर जगणं कठीण होईल असं शेतकरी म्हणाल्याचे राऊतांनी सांगितलं.

पीएम केअर फंडातून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा

प्रधानंत्री सहायता योजना म्हणजे पीएम केअर फंड नावाचा एका प्रकार नरेंद्र मोदींनी त्यांच्या कारकिर्दीत सुरू केला. जेव्हा नैसर्गिक, वैद्यकीय संकट, आपत्ती येईल, अशा वेळेला या फंडातून मोठ्या प्रमाणात मदत करता येईल म्हणून प्रधानमंत्री कार्यालयात वापर करता येईल. हा पीएम केअर फंड सरकारी आहे की खासगी हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, पण त्याच्यातील जी रक्कम आहे ती देशाच्या बजेटपेक्षा मोठी असावी असं लोकांचं म्हणणं आहे. त्या पीएम केअर फंडात मुंबईसारख्या शहरातून सव्वा दोन लाख कोटी रुपये जमा झाले. त्यामुळे पीएम केअर फंडातून, त्या पैशांचा वापर करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं अशी मागणी राऊत यांनी केली. देवेंद्र फडणवीस आणि दोन उप-उप आहेत, त्यांनी त्या दोन उपटसुंभांना घेऊन पंतप्रधांनाना भेटावं आणि मराठवाड्यातील , महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे ते सांगावं, असंही राऊत म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा