ताज्या बातम्या

Sanjay Raut: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरुन संजय राऊतांकडून शंका; म्हणाले...

बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली.

Published by : Dhanshree Shintre

बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. बदलापूरच्या घटनेवरुन पालकांसह नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आता याच प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिय दिली आहे.

मुळात त्याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहे हे साधं प्रकरण नाही. न्यायालयीन कस्टडीतला एक गुन्हेगार आहे. जगात तुम्ही फास्ट्रेक कोर्टात खटला चालवणारा आणि फाशी देणारा असं तुम्ही म्हटलं आहे. त्याला तातडीने एन्काऊंटर करण्याची गरज का पडली? कोणी पळून वैगेर जात नव्हतं. पोलीस व्हॅनमध्ये बेड्याने जखडलेला गुन्हेगार, मूर्ख असलेला गुन्हेगार पळून कसा जाईल? कमरेवरचा रिव्हॉल्व्हर कसा काढेल पोलीस अधिकाऱ्याचा हे असे पोलीस लेचीपेची असतील तर राजीनामी दिला पाहिजे असे संजय राऊत म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा