ताज्या बातम्या

Sanjay Raut Meet Shaad Pawar : शाहांच्या राजीनाम्यावरून आधी टीका, आता राऊत पवारांच्या भेटीला 'सिल्व्हर ओक'वर

याबद्दलची माहिती शरद पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

Published by : Shamal Sawant

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay ) यांनी शरद पवार यांनी भेट घेतली. संजय राऊत यांचे 'नरकातील स्वर्ग' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे औपचारिक निमंत्रण देण्यासाठी दोघांचीही भेट झाल्याचे समोर आले आहे. याबद्दलची माहिती शरद पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

शरद पवार यांनी पोस्ट शेअर करत लिहिले की, "राज्यसभेचे खासदार तसेच शिवसेनेचे नेते श्री. संजय राऊत यांनी आज माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीच्या वेळी त्यांनी आपल्या लेखणीतून साकारलेल्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे औपचारिक निमंत्रण दिले. या भेटीदरम्यान रोहन तावरे यांनी लिहिलेल्या वन्यजीवनावर आधारित पुस्तकावर सविस्तर चर्चा झाली. त्याचप्रमाणे, राज्य व देशातील विविध मुद्द्यांवरही विचारमंथन झाले. भेटीनंतर मी त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या".

संजय राऊत यांच्या 'नरकातील स्वर्ग' या पुस्तकाचे प्रकाशन 17 मे रोजी होणार आहे. हा कार्यक्रम रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे, राज्यसभा खासदार शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच लेखक, कवी जावेद अख्तर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

संजय राऊत यांच्या पुस्तकामध्ये काय असणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या पुस्तकामध्ये संजय राऊत यांचा तुरुंगातील अनुभव मांडण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यावेळी ते 100 दिवस तुरुंगात होते. या पुस्तकामध्ये सरकार, ईडी आणि तपास यंत्रणा या सगळ्यांची पोलखोल केली असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा