Sanjay Raut Team Lokshahi
ताज्या बातम्या

"मातोश्रीच्या अन् शिवसेनेच्या नादाला कुणी लागलं तर त्यांनी आपल्या गौऱ्या स्मशानात रचून यावं"

राणा दाम्पत्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून हल्ला करण्याचा भाजपचा प्रयत्न

Published by : Sudhir Kakde

नागपूर : मोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाचण्याच्या मुद्यावरून राणा (Navneet-Ravi Rana) दाम्पत्याने माघार घेतल्यानंतर आता संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. अमरावतीचे बंटी बबली मुंबईला आले, त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी हे करत असल्याचं सांगत त्यांनी पळ काढला अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये यासाठी शिवसेना सत्तेत असली किंवा नसली तरी तिथे उभी राहील.

मुंबईत हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक रस्त्यावर उतरले. शिवसैनिकांनी रुग्णवाहिका नेली, त्यामुळे शिवसैनिक मानवतावादी असल्याचं दिसतं. हिंदूत्वाच्या नावाखाली यांच्या खांद्यावरून बंदून ठेवून भाजपचे लोक आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. केंद्रीय यंत्रणांच्या बळावर हे सगळं केलं जातंय. आम्ही पोलिसांच्या बळावर हे सगळं करत नाही. आम्ही नेहमी पोलिसांशी संघर्ष करत आलोय असं म्हणत राणांवर निशाणा साधला.

संजय राऊत यांनी राणांवर निशाणा साधताना पुढे सांगितलं की, यापूढे अमरावतीमधून तुम्ही निवडून कसं येता हे आम्ही पाहू. ते खोटे प्रमाणपत्र दाखवून निवडून आले असंही संजय राऊत म्हणाले. तसंच उद्धव ठाकरेंनी मला आता काही दिवस इथेच नागपुरात थांबायला सांगितलं असं संजय राऊत म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड